AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol & Diesel: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी वाढ; जाणून घ्या आजचा दर

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे 27 फेब्रुवारीपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. | Petrol diesel rates

Petrol & Diesel: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी वाढ; जाणून घ्या आजचा दर
Petrol Diesel Price Hike
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: May 05, 2021 | 8:10 AM
Share

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरांनी (Diesel rates) आता वरच्या दिशेने प्रवास सुरु केल्याचे दिसत आहे. कारण, बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 19 आणि 21 पैशांची वाढ नोंदवण्यात आली. मंगळवारी पेट्रोल 15 तर डिझेल 18 पैशांनी महागले होते. (Petrol and diesel rates in Mahrashtra)

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे 27 फेब्रुवारीपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. मात्र, या निवडणुकानंतर पेट्रोलचा प्रतिलीटर 3 रुपयांनी तर डिझेल प्रतिलीटर 2 रुपयांनी महाग होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी वर्तविला होता. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा हा वरच्या दिशेचा प्रवास आणखी काही काळ सुरु राहू शकतो. परिणामी अगोदरच लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेले व्यापारी, वाहतूकदार आणि सामान्य नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे.

महाराष्ट्रात पेट्रोल- डिझेलचा आजचा दर काय?

मुंबई: पेट्रोल- 97.12, डिझेल 88.19 पुणे: पेट्रोल- 96.76, डिझेल 86.50 नाशिक: पेट्रोल- 97.52, डिझेल 87.24 औरंगाबाद: पेट्रोल- 98.35, डिझेल 89.43

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे पाहाल?

मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल.

सकाळी सहा वाजता जाहीर होतात पेट्रोल-डिझेलचे दर

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात.

संबंधित बातम्या:

Petrol and Diesel rates: पाच राज्यांतील निवडणुकीचा निकाल लागला अन् मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले

(Petrol and diesel rates in Mahrashtra)

Follow Us
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी