AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol and Diesel rates: पाच राज्यांतील निवडणुकीचा निकाल लागला अन् मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले

महाराष्ट्रात पेट्रोल- डिझेलचा आजचा दर काय? | Petrol and Diesel rates

Petrol and Diesel rates: पाच राज्यांतील निवडणुकीचा निकाल लागला अन् मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले
पेट्रोल आणि डिझेल दर
| Updated on: May 04, 2021 | 9:27 AM
Share

मुंबई: पाच राज्यांमधील निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर मोदी सरकारने अपेक्षेप्रमाणे पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात वाढ केली. त्यामुळे मंगळवारी पेट्रोल 15 पैसे तर डिझेल 18 पैशांनी महागले. तब्बल 66 दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. (Petrol and Diesel rates in your city)

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 27 फेब्रुवारीपासून कोणतीही वाढ झाली नव्हती. मार्च महिन्यात उलट इंधनाच्या दरामध्ये चारवेळा कपात झाली. मात्र, आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर वाढल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना इंधन दरवाढ करणे अपरिहार्य होते. मात्र, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका सुरु असल्याने केंद्र सरकार कोणताही धोका पत्कारायला तयार नव्हते. त्यामुळे किमान मतदानाचा शेवटचा टप्पा संपेपर्यंत मोदी सरकारकडून पेट्रोल-डिझेलचे दर कृत्रिमरित्या कमी ठेवले जातील, असा जाणकारांचा अंदाज होता. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरी या पाच राज्यांमध्ये आता नवे सरकार स्थापन होईल. यापैकी आसाम, पुदुचेरी आणि तामिळनाडूत भाजपला अपेक्षित यश मिळाले. मात्र, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये भाजपच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले.

महाराष्ट्रात पेट्रोल- डिझेलचा आजचा दर काय?

मुंबई: पेट्रोल- 96.95, डिझेल 87.98 पुणे: पेट्रोल- 96.60, डिझेल 86.30 नाशिक: पेट्रोल- 97.36, डिझेल 87.04 औरंगाबाद: पेट्रोल- 98.19, डिझेल 89.22

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे पाहाल?

मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल.

सकाळी सहा वाजता जाहीर होतात पेट्रोल-डिझेलचे दर

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात.

संबंधित बातम्या:

Gold Price Today: सोने पुन्हा महागले, चांदीच्या किमतीतही वाढ, खरेदी करण्यापूर्वी दर नक्की पाहा

कोव्हिड योद्ध्यांना आता सरकारी नोकरीत प्राधान्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

(Petrol and Diesel rates in your city)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.