Petrol Diesel Price Today | कच्चा तेलाच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) पुन्हा वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड आईलच्या (Brent Crude Oil) किंमती प्रति बॅरल 97 डॉलरच्या वर गेल्या आहेत. त्यांची वाटचाल 100 डॉलरकडे सुरु आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये अजून ही युद्धविराम झालेला नाही. दोन्ही देश अजूनही माघार घेण्याच्या तयारीत नाही. दुसरीकडे तैवानवरुन चीन आणि अमेरिका आमने-सामने आले आहेत. तर अनेक देशांत महागाईचा विस्फोट झाला आहे. अशा स्थितीतही काही दिवस आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली नाही. आता पुन्हा तेलाच्या किंमती कडाडल्या आहेत. मात्र आज मंगळवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) वाढ झालेली नाही. तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलवर तोटा सहन करावा लागत आहे. जून तिमाहीत IOC, HPCL आणि BPCL चा एकत्रित तोटा सुमारे 18,480 कोटी रुपये आहे.