AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel price: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जारी; सलग 26 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर

राज्यात आज सलग 26 व्या दिवशी इंधनाचे दर स्थिर असून, पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. नव्या दरानुसार मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर आहे.

Petrol Diesel price: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जारी; सलग 26 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर
पेट्रोल, डिझेलचे दर Image Credit source: twitter
| Updated on: May 01, 2022 | 6:35 AM
Share

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर (Petrol Diesel price) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दारमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून दर स्थिर आहेत. आज सलग 26 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोल, डिझेलच्या भावात शेवटची वाढ सहा एप्रिल रोजी करण्यात आली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत पेट्रोलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. 4 नोव्हेंबर 2021 ला केंद्र सरकारने इंधनावरील करात कपात केल्याने पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर सलग चार महिने इंधनाचे दर स्थिर होते. 22 मार्च 2022 रोजी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली. 22 मार्च ते 6 एप्रिल या काळात पेट्रोल (Petrol), डिझेलच्या दरात लिटर मागे तब्बल दहा रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली. आता पुन्हा एकदा दर स्थिर असल्याचे दिसून येत आहे. इंधन कंपन्यांनी जाहिर केलेल्या आजच्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये (Petrol Price in Delhi Today) पेट्रोल प्रति लिटर 105.41 रुपये लिटर तर डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील इंधनाचे दर

  1. पेट्रोलियम कंपन्यांकडून जाहिर करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राज्यात आज पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. आज मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर आहे.
  2. नागपूरमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर प्रति लिटर अनुक्रमे 120.40 आणि 103.73 आहे.
  3. परभणीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 123.51 रुपये असून, डिझेल प्रति लिटर 106.10 रुपये आहे.
  4. पुण्यात पेट्रोल प्रति लिटर 120.20 रुपये असून, डिझेल 103.10 रुपये लिटर आहे.
  5. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 121.13 रुपये आहे, तर डिझेलचा दर 103.79 रुपये आहे.

Follow Us
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार