AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today : दोन दिवसांनंतर पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, वाचा तुमच्या शहरातले ताजे दर

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. (Petrol Diesel Price Today)

Petrol Diesel Price Today : दोन दिवसांनंतर पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, वाचा तुमच्या शहरातले ताजे दर
पेट्रोल आणि डिझेल दर
| Updated on: May 10, 2021 | 8:38 AM
Share

मुंबई : गेले दोन दिवस इंधनाच्या किंमती स्थिर राहिल्यानंतर आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सलग चार दिवसांच्या दरवाढीनंतर पेट्रोलचा दर हा 87 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलीटर 1 रुपयांची वाढ झाली होती. आजही देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात 18 ते 27 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किंमतीत 26 ते 35 पैसे प्रतिलिटरपर्यंत वाढ झाली आहे. (Petrol Diesel Price Today 10 May 2021)

इंधन दरवाढीची कारणं काय?

फेब्रुवारी महिन्यानंतर मे मध्ये पुन्हा एकदा इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. तर मार्च आणि एप्रिलमध्ये 4 दिवस या किंमती खाली आल्या होत्या. दरम्यान जागतिक स्तरावर लसीकरण मोहिमेसह अन्य कारणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयामध्येही कमजोर होत आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते.

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

शहर  पेट्रोल (रुपये/लीटर)  डीज़ल (रुपये/लीटर)
नवी दिल्ली 91.53 82.06
मुंबई 97.86 89.17
कोलकाता 91.66 84.90
चेन्‍नई 93.38 86.96
नोएडा  89.64 82.51
बंगळूरु 94.57 86.99
हैदराबाद 96.13 89.47
पाटणा 93.77 87.27
जयपूर 97.92 90.61
लखनऊ 89.56 82.43

राज्यातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?

महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे परभणीत पाहायला मिळत आहे. परभणीमध्ये पेट्रोलचा दर हा 99.92 इतका आहे. त्यापाठोपाठ नांदेडमध्ये 99.73 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय परभणीत डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. परभणी शहरात डिझेलचा दर 89.79 रुपये इतका आहे. (Petrol Diesel Price Today 10 May 2021)

महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे पेट्रोल-डिझेलचे दर

क्रमांक शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
1 अहमदनगर ₹ 97.78 ₹ 87.73
2 अकोला ₹ 97.82 ₹ 87.80
3 अमरावती ₹ 98.41 ₹ 88.36
4 औरंगाबाद ₹ 98.36 ₹ 88.29
5 भंडारा ₹ 98.61 ₹ 88.56
6 बीड ₹ 99.05 ₹ 88.97
7 बुलडाणा ₹ 98.46 ₹ 88.42
8 चंद्रपूर ₹ 98.65 ₹ 88.59
9 धुळे ₹ 98.18 ₹ 88.13
10 गडचिरोली ₹ 99 ₹ 88.93
11 गोंदिया ₹ 99.11 ₹ 89.03
12 मुंबई उपनगर ₹ 97.86 ₹ 89.17
13 हिंगोली ₹ 99.20 ₹ 89.13
14 जळगाव ₹ 98.95 ₹ 88.86
15 जालना ₹ 99.15 ₹ 89.05
16 कोल्हापूर ₹ 97.67 ₹ 87.65
17 लातूर ₹ 98.99 ₹ 88.91
18 मुंबई शहर ₹ 97.86 ₹ 89.17
19 नागपूर ₹ 97.87 ₹ 87.85
20 नांदेड ₹ 99.73 ₹ 89.62
21 नंदूरबार ₹ 98.72 ₹ 88.65
22 नाशिक ₹ 97.72 ₹ 87.67
23 उस्मानाबाद ₹ 98.04 ₹ 88
24 पालघर ₹ 98.42 ₹ 88.32
25 परभणी ₹ 99.92 ₹ 89.79
26 पुणे ₹ 98.17 ₹ 88.10
27 रायगड ₹ 97.53 ₹ 87.46
28 रत्नागिरी ₹ 99.26 ₹ 89.18
29 सांगली ₹ 97.90 ₹ 87.87
30 सातारा ₹ 97.85 ₹ 87.79
31 सिंधुदुर्ग ₹ 98.67 ₹ 88.61
32 सोलापूर ₹ 98.47 ₹ 88.42
33 ठाणे ₹ 97.36 ₹ 87.30
34 वर्धा ₹ 97.86 ₹ 87.83
35 वाशिम ₹ 98.39 ₹ 88.35
36 यवतमाळ ₹ 98.94 ₹ 88.88

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (Petrol Diesel Price Today 10 May 2021)

संबंधित बातम्या :

अक्षय तृतीयेला सोने, बॉन्ड्स किंवा ईटीएफमध्ये करा गुंतवणूक, 2-3 महिन्यांत मिळेल जबरदस्त परतावा

SBI ची भन्नाट योजना, मुदत ठेवीतील पैसे ATM मधून काढता येणार, वाचा सविस्तर

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली