AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol-Diesel Rate: अरे देवा, जे नको तेच घडणार, तुमच्या खिशावर दरोडा? या तारखेनंतर पेट्रोल-डिझेलचा भाव वाढणार?

Petrol-Diesel Price Hike: देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप सरकारने त्याविषयीचा निर्णय जाहीर केला नाही. पण भाजपच्या सरकारचा पश्चिम बंगालमध्ये शपथविधी झाला आहे. त्यामुळे या तारखेपूर्वी इंधन दरवाढ होण्याची शक्यता आहे.

Petrol-Diesel Rate: अरे देवा, जे नको तेच घडणार, तुमच्या खिशावर दरोडा?  या तारखेनंतर पेट्रोल-डिझेलचा भाव वाढणार?
पेट्रोल डिझेलची दरवाढ?Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 10, 2026 | 8:41 AM
Share

Petrol-Diesel Price: अगोदरच गॅस दरवाढ आणि गॅसच्या पुरवठ्यातील अनियमिततेमुळे ग्राहक राजा हैराण झाला आहे. देशातील अनेक शहरासह गावांमध्ये गॅससाठी अजून ही लांबच लांब रांगा आहेत. त्यातच देशात गेल्या चार वर्षांपासून थांबवलेली पेट्रोल-डिझेलची दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महागाईचे चटके सहन करणाऱ्या जनतेवर महागाईचा बॉम्ब पडणार आहे. इराण- अमेरिका संघर्ष आणि होर्मुझ समुद्रधुनीतील तणावाचा फटका तेल उत्पादक कंपन्यांना बसत आहे. परिणामी ग्राहकांच्या खिशावर दरोडा पडण्याची शक्यता आहे.

कधीपासून होणार दरवाढ?

पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकारचा शपथविधी पूर्ण झाला आहे. बिझनेस टुडेने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार 15 मे पूर्वी देशात पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढू शकतो. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे म्हणजे क्रूड ऑईलच्या किंमतीत मोठी वाढ होईल. काही दिवसांपूर्वी जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमती वाढल्या होत्या. त्याचा परिणाम आता दिसेल. जागतिक बाजारात कच्चे तेल 70 डॉलर प्रति बॅरलहून आता 126 डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढले आहे.

बिझनेस टुडेला सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महागडे कच्चे तेल आणि होर्मुज संकटामुळे इंधनाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. त्याचा तोटा सरकारी कंपन्यांना सहन करावा लागत आहे. OMCs म्हणजे Indian Oil, BPCL, HPCL या कंपन्यांना तेल आयातीत दरमहा जवळपास 30 हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. सरकारी कंपन्यांना सध्या पेट्रोलवर 24 रुपये आणि डिझेलवर जवळपास 30 रुपये प्रति लिटरचे ओझे सहन करावे लागत आहे.

इतकी होणार दरवाढ

वृत्तानुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 4 ते 5 रुपये प्रति लिटर वाढ होण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर घरगुती गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे. एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 40 ते 50 रुपये वाढ होऊन एक हजाराहून अधिकची किंमत मोजावी लागेल. 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही मोठा बदल झाला नाही. पण आता तेल कंपन्यांसाठी आर्थिक बोजा सहन करणे अवघड झाले आहे. सरकारकडून एकतर मदत हवी अथवा दरवाढ हवी असा अटीतटीचा सामना होत आहे.

Follow Us
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास