AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol and Diesl price: मुंबईत इंधनदरवाढीचा भडका; एका लीटर पेट्रोलसाठी मोजावे लागतायत 107.20 रुपये

Petrol and Diesel | काल देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. तर 10 जुलैला पेट्रोलच्या दरात 35 पैसे आणि डिझेलच्या दरात 26 पैशांची वाढ झाली होती. सध्याची परिस्थिती पाहता डिझेलही लवकरच शंभरी ओलांडण्याची चिन्हे दिसत आहेत.

Petrol and Diesl price: मुंबईत इंधनदरवाढीचा भडका; एका लीटर पेट्रोलसाठी मोजावे लागतायत 107.20 रुपये
पेट्रोल-डिझेल दर
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Jul 12, 2021 | 9:15 AM
Share

मुंबई: बेरोजागारी आणि वाढती महागाई अशा दुहेरी संकटाचा सामना करत असलेल्या नागरिकांच्या चिंतेत इंधन दरवाढीमुळे आणखी भर पडताना दिसत आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करताना दिसत आहे. मुंबईत सोमवारी पेट्रोलच्या (Petrol) दरात 27 पैसे आणि डिझेलच्या दरात 19 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107.20 आणि डिझेलची प्रतिलीटर किंमत 97.29 रुपयांवर जाऊन पोहोचली. कोलकाता आणि दिल्लीतही इंधनाच्या दरांचा भडका उडाला आहे. (Petrol and Diesel rates in Mumbai)

काल देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. तर 10 जुलैला पेट्रोलच्या दरात 35 पैसे आणि डिझेलच्या दरात 26 पैशांची वाढ झाली होती. सध्याची परिस्थिती पाहता डिझेलही लवकरच शंभरी ओलांडण्याची चिन्हे दिसत आहेत.

पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर 4 मे पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढायला सुरुवात झाली होती. पेट्रोलने शंभरी गाठलेल्या देशातील प्रमुख शहरांमध्ये मुंबई, रत्नागिरी, औरंगाबाद, जैसलमेर, गंगानगर, हैदराबाद, लेह, बसवाडा, इंदौर, जयपूर, भोपाळ, ग्वाल्हेर, गुंटुर, काकिनाडा, चिकमंगळुरू, शिवामोग्गा आणि चेन्नईचा समावेश आहे.

मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

इक्रा या रेटिंग एजन्सीच्या माहितीनुसार, केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील करात प्रत्येकी 4.5 रुपयांची कपात करु शकते. त्यामुळे सरकारच्या उत्पन्नात विशेष घट होणार नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या मागणीमुळे सरकारच्या ही तूट भविष्यात भरून निघेल. त्यामुळे मोदी सरकारकडून लवकरच इंधनावरील करात कपातीचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो.

केंद्र सरकारने मार्च 2020 ते मे 2020 या पेट्रोवरील सेस आणि सरचार्जमध्ये 13 रुपये तर डिझेलवरील सेल आणि सरचार्जमध्ये तब्बल 16 रुपयांची दरवाढ केली आहे. चालू आर्थिक वर्षातील परिस्थिती पाहता पेट्रोल-डिझेलची मागणी 14 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, इंधनाच्या दरात कपात न झाल्यास ही मागणी 13 टक्क्यांपर्यंत खाली घसरेल. 2021 मध्ये आतापर्यंत पेट्रोलची मागणी 10.6 टक्क्यांनी घटली आहे. तर इंधनावरील करापोटी केंद्र सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नात 55 टक्क्यांनी वाढ होऊ ते 3.5 लाख कोटी इतके झाले आहे.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.

संबंधित बातम्या:

मोदी सरकारच्या निर्णयानंतर साखर कारखान्याचा मोठा निर्णय; ‘या’ गोष्टीसाठी 450 कोटींची तजवीज

Petrol & Diesel: मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार?

वर्षाअखेरपर्यंत पेट्रोल 125 रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज, तज्ज्ञांचं म्हणणं काय?

(Petrol and Diesel rates in Mumbai)

Follow Us
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरदा पवारांच्या राष्ट्रवादीतील बड
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरदा पवारांच्या राष्ट्रवादीतील बडा नेता हे काय बोलून गेला? थेट मुख्यमंत्री...
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच... पहा व्हिडीओ
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली