Petrol-Diesel Price Today : आज पुन्हा पेट्रोल, डिझेल 80 पैशांनी महाग, गेल्या आठ दिवसांत पेट्रोलचे दर सहा रुपयांनी वाढले

पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतींमध्ये वाढ सुरूच आहे. आज पुन्हा एकदा इंधनाच्या (Fuel) दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या 22 मार्चपासून तब्बल आठवेळा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत. आयओसीएलने दिलेल्या माहितीनुसार आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे प्रत्येकी 80 पैशांची वाढ झाली आहे.

Petrol-Diesel Price Today : आज पुन्हा पेट्रोल, डिझेल 80 पैशांनी महाग, गेल्या आठ दिवसांत पेट्रोलचे दर सहा रुपयांनी वाढले
Petrol-Diesel Price
Image Credit source: twitter
| Updated on: Mar 30, 2022 | 6:58 AM

Petrol, Diesel Price Hike : पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतींमध्ये वाढ सुरूच आहे. आज पुन्हा एकदा इंधनाच्या (Fuel) दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या 22 मार्चपासून तब्बल आठवेळा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत. आयओसीएलने दिलेल्या माहितीनुसार आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे प्रत्येकी 80 पैशांची वाढ झाली आहे. मंगळवारी देखील इंधनाच्या दरात लिटरमागे 80 पैशांची वाढ करण्यात आली होती. नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 101.01 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेल 92.27 रुपये प्रति लिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 115.88 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा दर वाढून 100.10 रुपये झाला आहे. देशभरातील जवळपास सर्वच महानगरांमध्ये पेट्रोलच्या किमतीने शंभरचा टप्पा पार केला आहे. गेल्या नऊ दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे तब्बल 6 रुपयांची वाढ झाली आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील इंधनाचे दर

आज पेट्रोलच्या दरात प्रति लिटर मागे 80 पैशांची तर डिझेलच्या दरात देखील 80 पैशांचीच वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 115.04 रुपये तर डिझेल 99.25 रुपयांवर पोहोचले आहे. तर औरंगाबादमध्ये पेट्रोल 115.69 आणि डिझेल 98.40 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 113.42 तर डिझेल 115.09 रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 114.71 आणि 97.46 रुपये इतके आहेत. तर उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल 114.96 रुपये लिटर आणि डिझेल 97.73 रुपये लिटर इतके आहे.

या राज्यात पेट्रोल 100 रुपयांपेक्षा अधिक महाग

गेल्या नऊ दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये आठवेळ वाढ झाली आहे. 22 मार्चनंतर केवळ 24 मार्च रोजी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर होते. गेल्या नऊ दिवसांमध्ये इंधनाचे दर तब्बल सहा रुपयांनी महाग झाले आहेत. नव्या दरानुसार मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे दर हे 100 रुपयांपेक्षा अधिक आहेत.

 

संबंधित बातम्या

थर्ड पार्टी विमा महागला; दुचाकीसह रिक्षा चालकांना फटका बसणार; इलेक्ट्रीक वाहनांच्या इन्शुरन्सवर 15 टक्के सूट

अदानी ग्रुपचे शेअर्स तेजीत; ट्रेडिंगमध्ये सर्वोच्च पातळीवर

Hero Moto Corp : आयकर विभागाच्या छापेमारीत 1000 कोटींचा उघडकीस आला घोटाळा, Heroचे शेअर ही 7 टक्क्याने कोसळले!