Hero Moto Corp : आयकर विभागाच्या छापेमारीत 1000 कोटींचा उघडकीस आला घोटाळा, Heroचे शेअर ही 7 टक्क्याने कोसळले!

दुचाकी वाहन बनवणारी भारतातील अग्रगण्य कंपनी हीरो मोटो कॉर्प चे शेअर मंगळवारी 7 टक्क्याने कोसळले. कंपनीवर आयकर विभागाचे छापेमारी सत्र सुरू असतानाच कंपनीचे शेअर्स देखील घसरले.

Hero Moto Corp : आयकर विभागाच्या छापेमारीत 1000 कोटींचा उघडकीस आला घोटाळा, Heroचे शेअर ही 7 टक्क्याने कोसळले!
Hero MotoCorpImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 9:16 PM

मुंबई : हिरो होंडा ही दुचाकी वाहन निर्मिती करणारी एक अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीने आतापर्यंत देशवासीयांच्या हृदयावर राज्य मिळवले आहे. या कंपनीने बाजारामध्ये आता पर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे टू-व्हीलर्सची निर्मिती केली आहे परंतु हल्ली ही कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या कंपनीवर आयकर विभागाची धाड पडली आहे. या छापेमारीत अनेक गोष्टींचा उलगडा होईल असे देखील सांगण्यात येत आहे. आयकर विभाग (Income Tax Department) ने हीरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) वर टाकलेल्या छापेमारी संदर्भात मंगळवारी एक मोठा खुलासा केला. कंपनी ने केलेल्या 1000 कोटी रुपयांच्या व्यवहार खर्चावर आम्ही विश्लेषण करत आहोत. या व्यवहारातील कागदपत्र बनावट(Fake Documents) असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, असे आयकर विभागाने आपल्या निवेदनात म्हंटले. सूत्रांच्या माहितीनुसार आयकर विभाग कंपनीच्या तपासणी साठी डिजीटल डेटा आणि अन्य कागदपत्रांची शोध तपासणी करत आहे.

फार्महाउसची देखील केली जाणार आहे तपासणी

आयकर विभाग दिल्ली बाहेरील परिसरामध्ये असलेल्या फार्महाउसची देखील तपासणी करणार आहे. हा व्यवहार करताना बनावट पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. हा व्यवहार करताना 1000 कोटी रुपयांचे बनावट पेमेंट केले गेले होते.

Hero MotoCorp चे शेअर गडाडले

या छापेमारी नंतर BSE हीरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) चे शेअर 6.68 टक्क्याने घसरले आणि हे शेअर 2,219 रुपयाच्या स्तरावर पोहचून बंद झाला. दिवस भराच्या कामकाज दरम्यान कंपनीचे स्टॉक 2,154 ने गडाडले.

या महिन्यात झाली होती छापेमारी

आयकर विभागाने या महिन्यात पवन मुंजाल (Pawan Munjal) सोबत हीरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) चे प्रमोटर्स ऑफिस आणि घरावर देखील छापेमारी टाकली. याप्रसंगी उपस्थित असणाऱ्या लोकांचे स्टेटमेंट नोंदवण्यात आले आणि पंचनामा देखील करण्यात आला.

40 देशांमध्ये पसरलेला आहे कंपनीचा पसारा

हीरो मोटो कॉर्प हि प्रसिद्ध कंपनी आहे.या कंपनीच्या उत्पादनाची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते 2001 मध्ये दुचाकी बनवणारी जगातील सर्वात दुसऱ्या क्रमांकाची कंपनी म्हणून या कंपनीने ओळख मिळवली. कंपनीने आतापर्यंत गेल्या 20 वर्षांपासून या क्षेत्रांमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले आहे. कंपनीचे हल्ली आशिया आफ्रिका साउथ आणि सेंट्रल अमेरिका समवेत 40 देशांमध्ये आपले साम्राज्य पसरलेले आहे.घरगुती बाजारामध्ये 50 टक्क्या पेक्षा जास्त बाजाराची हिस्सेदारी आहे. ही कंपनी दुचाकी वाहन क्षेत्रात अग्रगण्य स्थानावर आहे.

इतर बातम्या : 

कारागृहातील कैद्यांसाठी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय, 7 टक्के व्याजदराचे वैयक्तिक कर्ज मिळणार!

The Kashmir Files मुळे देशातील बंधुप्रेम संपवलं जातंय, शरद पवारांचं वक्तव्य; पंतप्रधान मोदींवर निशाणा

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.