थर्ड पार्टी विमा महागला; दुचाकीसह रिक्षा चालकांना फटका बसणार; इलेक्ट्रीक वाहनांच्या इन्शुरन्सवर 15 टक्के सूट

थर्ड पार्टी विमा महागला; दुचाकीसह रिक्षा चालकांना फटका बसणार; इलेक्ट्रीक वाहनांच्या इन्शुरन्सवर 15 टक्के सूट
येत्या एप्रिल महिन्यांपासून थर्ड पार्टी विमा महागणार आहे. त्यामुळे दुचाकी, तीन चाकींसह कार चालकांच्या खिशाला फटका बसणार

जेव्हा एखाद्या वाहनाचा रस्ते अपघात होतो, तेव्हा त्याला इतर कोणत्याही व्यक्तीचे नुकसान झाल्यास थर्ड पार्टी इन्शुरन्स अंतर्गत भरपाई दिली जाते. याचा खर्च विमा कंपनी उचलते. म्हणजेच थर्ड पार्टी इन्शुरन्स थेट फायदा कोणत्याही अपघातात नुकसान झालेल्या तिसऱ्या व्यक्तीला मिळतो.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महादेव कांबळे

Mar 30, 2022 | 1:44 AM


मुंबईः येत्या एप्रिल महिन्यांपासून थर्ड पार्टी विमा (Third party insurance) महागणार आहे. त्यामुळे दुचाकी, तीन चाकींसह कार चालकांच्या (Car driver) खिशाला फटका बसणार आहे. केंद्र सरकारच्या (Central Government) नव्या प्रस्तावासह 1000 सीसी खासगी कार असलेल्या गाडीचा थर्ड पार्टी इन्शुरन्स 2 हजार 14 रुपये होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2019-20 मध्ये तो 2 हजार 72 रुपयांना मिळायचा. खासगी कार 1000 सासी ते 1500 सीसी दरम्यान असेल तर इन्शुरन्स 3 हजार 416 रुपयांनी मिळेल तर 1500 पेक्षा जास्त सीसीच्या कारचा इन्शुरन्स 7 हजार 897 रुपये होणार आहे.

दुसरीकडे दुचाकी 150 सीसी ते 350 सीसी दरम्यान असतील तर थर्ड पार्टी इन्शुरन्स 1.366 रुपयांपासून सुरु होणार आहे. दुचाकी 350 सीसीच्यावर असेल तर इन्शुरन्स 2,804 रुपये असेल.

होणारे फायदे

या विम्याअंतर्गत थर्ड पार्टीला दायित्व कवच मिळते. जेव्हा एखाद्या वाहनाचा रस्ते अपघात होतो, तेव्हा त्याला इतर कोणत्याही व्यक्तीचे नुकसान झाल्यास थर्ड पार्टी इन्शुरन्स अंतर्गत भरपाई दिली जाते. याचा खर्च विमा कंपनी उचलते.
म्हणजेच थर्ड पार्टी इन्शुरन्स थेट फायदा कोणत्याही अपघातात नुकसान झालेल्या तिसऱ्या व्यक्तीला मिळतो. म्हणूनच याला थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणतात. कार, बाईक किंवा इतर वाहनाचा अपघात झाला आणि त्यात शारीरिक किंवा मालमत्तेचे नुकसान झाले, तर वाहन मालकाला नुकसान भरपाई करावी लागते.

विमा कंपनी त्यांच्या पेमेंटसाठीदेखील जबाबदार आहे अनेक प्रकारच्या भरपाईचा यामध्ये समावेश होतो.

इलेक्ट्रीक वाहन मालकांना फायदा

इलेक्ट्रीक कार, दुचाकी, पॅसेंजर गाड्यांसाठी इन्शुरन्सवर 15 टक्के सूट असेल. तर हायब्रीड इलेक्ट्रीक वाहनांवर सरकार 7.5 टक्के सूट देण्याची तयारी करत आहे.

वाहनांचा प्रकार                             सध्या          1 एप्रिलनंतर

1 हजार सीसीपर्यंतच्या कार             2072                2094
1500 सीसीपर्यंतच्या कार                3211                 3416
1500 पेक्षा जास्त सीसीच्या कार       7890                7897
75 सीसीपर्यंतच्या दुचाकी                   482                   538
150 सीसीपर्यंतच्या दुचाकी                  752                  ७१४
350 सीसीपर्यंतच्या दुचाकी                1193                  1336
350 पेक्षा जास्त सीसीच्या दुचाकी       2313                 2804

संबंधित बातम्या

भाजप खासदार वरुण गांधी आणि संजय राऊतांमध्ये तब्बल 3 तास चर्चा! नेमकं काय शिजतंय?

सामना वाचायचा नाही आणि संजय राऊतांवर बोलायचं नाही, चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?

पुन्हा शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर, औरंगाबादेत शिवसेनेचे दोन गट आपसात भिडले

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें