भाजप खासदार वरुण गांधी आणि संजय राऊतांमध्ये तब्बल 3 तास चर्चा! नेमकं काय शिजतंय?

भाजप खासदार वरुण गांधी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात आज बैठक पार पडली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाल्याचीही माहिती मिळत आहे.

भाजप खासदार वरुण गांधी आणि संजय राऊतांमध्ये तब्बल 3 तास चर्चा! नेमकं काय शिजतंय?
वरुण गांधी आणि संजय राऊत यांच्यात दिल्लीत 3 तास चर्चाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 11:23 PM

नवी दिल्ली : शिवसेना (Shivsena) भाजपमधील (BJP) सख्यही संपूर्ण देशानं पाहिलं आणि आता त्यांचं वैरही देश पाहत आहे. भाजप आणि शिवसेनेतील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. या दोन्ही पक्षातील नेत्यांची एकमेकांवरील चिखलफेक आता नित्याचीच झाली आहे. अशावेळी राष्ट्रीय पातळीवर या दोन्ही पक्षाशी संबंधित एक महत्वाची घटना घडलीय. भाजपचे खासदार मात्र सध्या भाजपपासून स्वत:ला काहीसं दूर ठेवलेले वरुण गांधी (Varun Gandhi) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात आज बैठक पार पडली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाल्याचीही माहिती मिळत आहे. वरुण गांधी आणि संजय राऊतांच्या या ‘डिनर डिप्लोमसी’मुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.

संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी वरुण गांधी आणि राऊतांमध्ये बैठक पार पडली. मंगळवारी संध्याकाळी ही बैठक झाली. यावेळी दोन्ही खासदारांमध्ये देशपातळीवरील राजकारणावर चर्चा झाली. अलीकडच्या काळात वरुण गांधी यांनी स्वत:ला भाजपपासून काहीसं अलिप्त ठेवल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. ते नाराज असल्याचंही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

वरुण गांधी भाजपशी काडीमोड घेणार?

खासदार वरुण गांधी हे भाजपमध्ये सध्या नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. ते उत्तर प्रदेशातील पिलीभीतचे खासदार आहेत. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपचं नाव काढलं. वरुण गांधी हे सध्या स्वपक्षीयांवरच तोंडसुख घेत असल्याचं पाहायला मिळत आहेत. अशावेळी ते भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीत झालेल्या हिंसेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी वरुण गांधी यांनी केली होती. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्रंही लिहिलं. तसेच पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणीही केली होती. लखीमपूर हिंसेबाबत वरुण गांधी यांनी योगी सरकारला पत्रं पाठवलं होतं. आंदोलक शेतकऱ्यांवर निर्दयीपणे हल्ला करण्यात आला होता. गांधी जयंतीच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली होती. अन्नदात्यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली ती एखाद्या सभ्य समाजासाठी अक्षम्य आहे. आंदोलक शेतकरी आपले बांधव आहेत. काही मुद्द्यांवर आंदोलकांमध्ये रोष असेल आणि ते लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असतील तर त्यांच्याशी संयम आणि धैर्याने वागलं पाहिजे, अशा शब्दात वरुण यांनी योगी सरकारला सुनावलं होतं.

इतर बातम्या : 

‘अशी ही बनवाबनवी’ एकदा पहाच; जयंत पाटलांचा इस्त्रायलच्या अधिकाऱ्याला सल्ला!

येऊ का ‘झाडू’ मारायला?, दिल्ली, पंजाब जिंकल्यानंतर ‘आप’चा मुंबई महापालिकेवर डोळा; सर्व जागा लढण्याची घोषणा

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.