वरुण गांधी टीएमसीमध्ये जाणार?; पुढच्या आठवड्यात ममता बॅनर्जींची भेट घेण्याची शक्यता

भाजप नेते वरुण गांधी गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहे. त्यामुळेच ते सातत्याने भाजपवर जोरदार हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे.

वरुण गांधी टीएमसीमध्ये जाणार?; पुढच्या आठवड्यात ममता बॅनर्जींची भेट घेण्याची शक्यता
Varun Gandhi
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 4:43 PM

नवी दिल्ली: भाजप नेते वरुण गांधी गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहे. त्यामुळेच ते सातत्याने भाजपवर जोरदार हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वरुण गांधी हे भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारी असल्याचं बोललं जात आहे. वरुण गांधी हे टीएमसी नेत्यांच्या संपर्कात असून ते लवकरच टीएमसीत प्रवेश करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

टीएमसीच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पुढील आठवड्यात दिल्ली दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी वरुण गांधी त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेतले. मोदींच्या या निर्णयावरही त्यांनी सवाल केले आहेत. तसेच त्यांनी या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रंही लिहिलं आहे.

मंत्रिमंडळातही नाही आणि कार्यकारिणीतही नाही

वरुण गांधी गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर नाराज आहेत. त्यामुळेच ते केंद्र सरकार आणि भाजप शासित राज्यातील कारभारावर सातत्याने निशाना साधत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता. त्यात स्थान मिळेल अशी वरुण यांना अपेक्षा होती. मात्र, भाजपने त्यांना केंद्रात संधी दिली नाही. तसेच पक्षाच्या कार्यकारिणीत त्यांना आणि त्यांची आई मनेका गांधी यांना स्थान देण्यात आले नव्हते. तेव्हापासून त्यांनी थेट पक्षावरच हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. लखीमपूर खेरी हिंसाचारावरून तर त्यांनी अनेक वेळा योगी सरकारवर हल्ला चढवला आहे. तसेच गांधी जयंतीच्या दिवशी गांधी विरुद्ध गोडसे हा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू होता. त्यावरूनही त्यांनी हल्लाबोल केला होता.

टीएमसीच्या नेत्यांनी दिले संकेत

तृणमूल काँग्रेस संपूर्ण देशात काँग्रेसला पर्याय म्हणून उभा राहू पाहत आहे. टीएमसीने पश्चिम बंगालमधून बाहेर पडत हिंदी भाषिक राज्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. पुढच्या आठवड्यात ममता बॅनर्जी या दिल्लीत येण्याची शक्यात आहे. यावेळी वरुण गांधी या ममता बॅनर्जींना भेटण्याची शक्यता आहे. दुसरीकडे टीएमसीला ही उत्तर प्रदेशात बड्या नेत्याची गरज आहे. उत्तर प्रदेशात वातावरण निर्मिती करू पाहणारा नेता टीएमसीला हवा आहे. उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते ललितेश त्रिपाठी यांनी नुकताच टीएमसीत प्रवेश केला आहे. पण संपूर्ण राज्याला अपिल होईल असा नेता टीएमसीला अद्याप मिळालेला नाही. वरुण गांधी हा टीएमसीसाठी चांगला पर्याय होऊ शकतो. मीडिया रिपोर्टनुसार टीएमसीच्या एका ज्येष्ठ नेत्याने वरुण गांधी भाजप सोडण्याच्या मनस्थितीत असून ते टीएमसीच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे वरुण गांधी भाजप सोडण्याच्या चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.

प्रियंका गांधींसोबत चर्चा करणार?

एकीकडे वरुण गांधी टीएमसीत जाण्याची चर्चा असतानाच त्यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्याशीही चर्चा केली आहे. लंच किंवा डिनरच्यावेळी या दोघांची चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, या भेटीनंतर काहीही राजकीय उलथापालथ झालेली नाही. काही भाजप नेत्यांच्या मते वरुण यांनी प्रियंका गांधी यांची भेट घेतली असून ते केव्हाही भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाऊ शकतात. टीएमसीमध्ये त्यांना अधिक संधी नाहीत. हिंदी भाषिक राज्यात टीएमसीचं अस्तित्व नाहीये. त्यामुळे ते काँग्रेसमध्येच जाऊ शकतात, असं या नेत्यांचं म्हणणं आहे.

संबंधित बातम्या:

7th Pay Commission: नोव्हेंबरमध्ये 4 महिने जोडून मिळणार थकबाकी, DA-DR मध्ये चांगली वाढ

‘ते निम्मे डॉक्टर, त्यांनी माझी मानसिकता तपासावी, मी त्यांचं डोकं तपासतो’, चंदक्रांत पाटलांचा राऊतांवर पलटवार

आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलं नाही, कट कारस्थानही रचलं नाही: हायकोर्ट

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.