सामना वाचायचा नाही आणि संजय राऊतांवर बोलायचं नाही, चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?

सामना वाचायचा नाही आणि संजय राऊतांवर बोलायचं नाही, चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर चंद्रकांत पाटलांची खोचक टीका
Image Credit source: tv9

संजय राऊतांवर बोलायचे नाही म्हणत त्यांना राऊतांना कोपरखिळ्या मारल्या आहेत. सध्या सामना (Saamna) वाचायचा नाही आणि संजय राऊत वर बोलायचे नाही असे ठरवले आहे, असा टोला पाटलांनी लगावला आहे.

शंकर देवकुळे

| Edited By: दादासाहेब कारंडे

Mar 29, 2022 | 10:40 PM

सांगली : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Ruat) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र सध्या चंद्रकांत पाटलांनी तोडा वेगळा पवित्रा घेतलाय. संजय राऊतांवर बोलायचे नाही म्हणत त्यांना राऊतांना कोपरखिळ्या मारल्या आहेत. सध्या सामना (Saamna) वाचायचा नाही आणि संजय राऊत वर बोलायचे नाही असे ठरवले आहे, असा टोला पाटलांनी लगावला आहे. त्यामुळे यावर आता संजय राऊत यांचीही तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. तसेच राऊतांना जागतिक स्तरावर अध्यक्ष पद देणार असतील तरी माझे काही नाही, असेही चंद्रकांत पाटली म्हणाले आहेत. तसेच ईडीच्या धाडींबाबत बोलताना, सगळ्या एजन्सीला स्वायत्त आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या धाडीवरून मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे.

पडळकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

तसेच गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी केलेल्या पुतळ्याच्या उद्घाटनावरूही त्यांनी महाविकास आघाडीला डिवचलं आहे. मी पडळकरांचं मनापासून अभिनंदन करतो. अतिशय शक्ती प्रदर्शन करत त्यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे उद्घाटन केले. शेवटी पोलीस देखील हतबल होते आणि ड्रोनद्वारे फुले टाकली, अशा शब्दात त्यांनी पडळकरांचं कौतुक केलंय. तसेच सगळी सत्ता आमच्याकडे आहे, असेही ते म्हणाले आहेत. रविवारी या पुतळ्याच्या उद्घानावरून महाविकास आघाडी आणि भाजप आमनेसामने आले होते. शरद पवरांच्या हस्त उद्घाटनाला गोपीचंद पडळकरांनी कडाडून विरोध केला आणि शेवटी गनिमी काव्याने पुतळ्याचे उद्घाटन केले.

जयंतीवर बंधनं आणाल तर परिणाम भोगाल

तसेच हिंदू सणांबाबत बोलताना, हे सरकार पूर्णपणे हिंदू विरोधी सरकार आहे. यांच्याकडे श्रद्धा ही नाही, शून्यता बाथल असे हे सरकार आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे. तसेच वीज कर्मचारी आंदोलनाविषयी ही त्यांना भाष्य केले आहे. या सरकारचे नाक दाबल्या शिवाय चालणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांना चांगला दिलासा मिळाला आहे. आमच्या वकिलांनी चांगला मुद्दा काढला, असेही ते म्हणाले आहेत. तर कोरोना नियमाबाबत बोलताना, देशाचे पंतप्रधान मोदी यांनी कोविड संपल्यानंतर सगळी बंधन काढली. मग आता आंबेडकरज यंतीला बंदी आणली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

‘अशी ही बनवाबनवी’ एकदा पहाच; जयंत पाटलांचा इस्त्रायलच्या अधिकाऱ्याला सल्ला!

पुन्हा शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर, औरंगाबादेत शिवसेनेचे दोन गट आपसात भिडले

हिंदू सण जल्लोषात साजरे करण्याची परवानगी द्या, अजानच्या आवाजाबाबत मुंबईकर नाराज-भाजप

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें