Petrol-Diesel Price: कच्चा तेलाचा भडका! पेट्रोल-डिझेल महागणार? नायरानंतर सरकारी कंपन्या महागाईचा गिअर टाकणार? 1 लिटरचा आजचा भाव काय?
Petrol Diesel Prices Today 4 October 2026 : देशात नायरा कंपनीच्या पंपावर पेट्रोल 5 रुपये तर डिझेल 3 रुपयांनी महागले. हाच नायरा पॅटर्न सरकारी कंपन्याही राबवणार का? देशात इंधनाचे दर भडकणार का? काय आहे 1 लिटर पेट्रोल-डिझेलचा भाव?

Petrol-Diesel Price Today: जागतिक बाजारात इंधन कोंडी सोडवण्याच्या प्रयत्न अमेरिकेसह इराक, सौदी अरब करत असले तरी कच्चा तेलाचा भडका उडला आहे. G7 देशाने ही राखीव तेल साठा बाजारात उतरवला आहे. पण झाले उलटेच. क्रूड ऑईलच्या किंमती भडकल्याने नायरा कंपनीने काल देशात पेट्रोल 5 रुपये तर डिझेल 3 रुपयांनी महाग केले. हाच नायरा पॅटर्न सरकारी कंपन्या राबवणार का? महागाईचा झटका बसणार का? काय आहे आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव?
कच्चा तेलाचा भडका
जागतिक बाजारात तेलाची मुबलक आवक असूनही दबावामुळे किंमती भडकल्या आहेत. अमेरिका इराणवर हल्ला चढवण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे रशिया युक्रेनवर भीषण हल्ला करणार असल्याचे वृत्त समोर येत असल्याने कच्चा तेलाच्या किंमतींनी उकळी फुटली आहे. जागतिक बाजारातील बेंचमार्क ब्रेंट क्रूड ऑईलचा भडका उडला आहे. 97.90 डॉलरवरून भाव थेट 102.25 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला. तर अमेरिकेतली बेंचमार्क WTI कच्चा तेलाचे दर 92 डॉलरवरून किंचित घसरले. हा दर 91.11 प्रति बॅरलवर पोहचला. भारतीय क्रूड बास्केटमध्ये सरासरी किंमत 116.04 प्रति डॉलरच्या घरात पोहचला आहे. ओपेकचा कच्चा तेलाचा भाव 111 डॉलर प्रति बॅरलपेक्षा अधिक आहे.
प्रमुख महानगरातील आजचे इंधन दर काय?
goodreturns ने सरकारी तेल कंपन्यांचा भावफलक दिला आहे. या आकडेवारीनुसार, देशातील प्रमुख महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या भावात मोठी तफावत आढळलेली नाही.
मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीत पेट्रोलचा भाव 111.21 रुपये तर डिझेलची किंमत 97.83 रुपये इतकी आहे.
दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 102.12 रुपये तर डिझेलचा भाव 95.20 रुपये असा आहे.
चेन्नई: दक्षिणेतील मोठे शहर चेन्नईत पेट्रोलचा भाव 107.76 रुपये तर डिझेलची किंमत 99.55 रुपये अशी आहे
कोलकत्ता: पेट्रोलची किंमत 113.51 रूपये तर डिझेलची किंमत 99.82 रुपये आहे.
होर्मुझ समुद्रधुनी बंद, तरी पुरवठा वाढला
होर्मुझ समुद्रधुनीवरून इराण आणि अमेरिकेत संघर्ष पेटला आहे. हा मार्ग बंद झाला असला तरी इंधन पुरवठा काही थांबलेला नाही. उलट बाजारात मुबलक इंधन पुरवठा आहे. गल्फ देशांनी, आखातातील सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरातने नवीन पाईपलाईन टाकून इंधन पुरवठा वाढवला आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातापासूनच नवीन पाईपलाईन द्वारे दररोज किमान 16.5 दशलक्ष बॅरल कच्चे तेल बाजारात येत आहे. युद्ध भडकले तेव्हा मार्च महिन्यात हा आकडा सरासरी 10.5 दशलक्ष बॅरल इतका होता.
किंमती एका SMS वर
पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.