Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल भरायला जाताय? मग आजचा 1 लिटरचा दर जाणून घ्या, कच्चा तेलाच्या उकळीने खिशाला झळ?

Petrol Diesel Prices Today 9 October 2026 : जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमती 103 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यावधी निवडणुका होईपर्यंत इराणवर हल्ला न चढवण्याचा दावा केल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. काय आहे आजचा 1 लिटरचा दर जाणून घ्या, खिशाला झळ बसणार?

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल भरायला जाताय? मग आजचा 1 लिटरचा दर जाणून घ्या, कच्चा तेलाच्या उकळीने खिशाला झळ?
पेट्रोल आणि डिझेलची किंमत
| Updated on: Oct 09, 2026 | 6:35 AM

Petrol Diesel Prices Today : कच्चा तेलाच्या किंमतींना जागतिक बाजारात उकळी फुटली. कच्चा तेलाच्या किंमती 103 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्याने चिंता वाढली आहे. दरफलकावरील आकडे अजून वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यावधी निवडणुकांकडे बोट करत सध्या इराणवर चढाईचा इरादा नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे मध्य-पूर्वेत शांतता नांदेल असा दावा करण्यात येत आहे. पण हुती, इराणच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. इराणच्या दाव्यानुसार, होर्मुज समुद्रधुनी ही पूर्णपणे खुली आहे. जवळपास 2 कोटी बॅरल कच्चे तेलाची वाहतूक येथून झाली आहे. होर्मुज समुद्रधुनी पूर्णपणे बंद असल्याचा अमेरिकन सेंट्रल कमांडचा दावा इराणने फेटाळला आहे. एकंदरीतच पुरवठा साखळी खंडीत होणार नसली तरी तेलाच्या किंमती भडकल्याने चिंता वाढली आहे. काय आहे आजचा 1 लिटरचा दर जाणून घ्या.

भारतात सरकारी तेल कंपन्यांकडून दिलासा

Loading...

जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत चढउतार सुरू आहे. मध्यपूर्वेतील तणावामुळे ऊर्जा बाजारावर संकट कायम आहे. सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज 9 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या, IOCL, BPCL, HPCL ने पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर कायम ठेवले आहे. नायराने पाच दिवसांपूर्वी पेट्रोलमध्ये पाच रुपये तर डिझेलमध्ये तीन रूपयांची वाढ केली होती. त्यानंतर सरकारी कंपन्या सुद्धा किंमत वाढवण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.

देशातील प्रमुख शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत काय?

goodreturns या संकेतस्थळानुसार, सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजता किंमती अपडेट केल्या आहेत. त्यानुसार, देशातील प्रमुख महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सध्या कोणतीही तफावत आढळलेली नाही.

मुंबई :  आर्थिक राजधानीत पेट्रोलचा भाव 111.21 रुपये तर डिझेलची किंमत 97.83 रुपये इतकी आहे.

दिल्ली: राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 102.12 रुपये तर डिझेलचा भाव 95.20 रुपये असा आहे.

चेन्नई: दक्षिणेतील मोठे शहर चेन्नईत पेट्रोलचा भाव 107.76 रुपये तर डिझेलची किंमत 99.55 रुपये अशी आहे

कोलकत्ता: पेट्रोलची किंमत 113.51 रूपये तर डिझेलची किंमत 99.82 रुपये आहे.

किंमती जाणून घ्या एका SMS वर

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.

इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.

बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.

त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.

त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us