AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Price: भारतातील प्रत्येक शहरात पेट्रोलचा दर वेगवेगळा का आहे? ‘हे’ आहे कारण

देशभरातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर हे वेगवेगळे आहेत. प्रत्येक राज्यामध्ये पेट्रोलचा दर वेगवेगळा असण्याचे कारण काय आहे? प्रश्नाचे उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

Petrol Price: भारतातील प्रत्येक शहरात पेट्रोलचा दर वेगवेगळा का आहे? 'हे' आहे कारण
Tax on Petrol
| Updated on: Sep 28, 2025 | 8:48 PM
Share

इंधनाच्या दरामुळे देशातील नागरिक हैराण झाले आहेत. पेट्रोलचे दर 110 रुपयांपर्यंत वाढले असल्याने सर्वसामान्य जनतेला आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे. तुम्हाला कदाचित माहिती नसेल की देशभरातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर हे वेगवेगळे आहेत. राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 94.77 रुपयांना मिळते तर कोलकातामध्ये 105.41 रुपयांना मिळते. प्रत्येक राज्यामध्ये पेट्रोलचा दर वेगवेगळा असण्याचे कारण काय आहे? प्रश्नाचे उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

विशाखापट्टणममध्ये सर्वात जास्त तर दिल्लीत सर्वात कमी दर

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये सर्वात जास्त दराने पेट्रोल विकले जात आहे. येथे एक लिटर पेट्रोलची किंमत 109.04 प्रति लिटर आहे. तसेच हैदराबादमध्ये 107 रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल विकले जात आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर सर्वात कमी म्हणजे 94.77 रुपये प्रति लिटर आहे. तर दिल्लीत डिझेलची किंमत 87.62 रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोलच्या किमतींमागील कारण

तुमच्यापैकी अनेकांना वाटत असेल की पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीवर निश्चित केल्या जातात. मात्र असे नाही, भारतात प्रत्येक राज्य स्वतःचा व्हॅट, उत्पादन शुल्क आणि स्थानिक कर लादते, ज्यामुळे विविध राज्यांमध्ये इंधनाची किंमत वेगवेगळी असते. मे 2022 पासून केंद्र सरकारने आणि अनेक राज्यांनी कर कमी केले आहेत, मात्र त्यानंतरही इंधनाच्या दरात फारशी कपात झालेली नाही.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आणि परकीय चलन दर रोज सकाळी 6 वाजता जाहीर होतात. याचाही थोडाफार परिणाम इंधनाच्या दरावर होतो. मात्र स्थानिक करांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदलांचा परिणाम कधीकधी उशिरा किंवा खूप कमी दिसून येतो. त्यामुळे इंधनाच्या दरात काही पैशांचा बदल होतो.

भारतात पेट्रोल महाग का आहे?

जगभरातील इंधनाच्या किंमती सतत बदललत असतात. इराणमध्ये पेट्रोल फक्त 2.4 प्रति लिटरने विकले जाते, तर हाँगकाँगमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 304 रुपये पर्यंत आहे. अमेरिकेतही, भारतापेक्षा पेट्रोल स्वस्त आहे; अमेरिकेत 80 रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल मिळते. ही रक्कम भारतातील सरासरी किमतीपेक्षा 21 रुपयांनी कमी आहे. भारतात पेट्रोल महाग असण्याचे सर्वात मोठे कारण हे कर रचना आहे.

वेगवेगळे कर

भारतात केंद्र आणि राज्य सरकार पेट्रोलवर उत्पादन शुल्क आणि व्हॅट सारखे महत्त्वपूर्ण कर लावतात. यामुळे जागतिक बाजारात कच्चे तेल स्वस्त झाले तरी इंधनाच्या किमतीवर फारसा परिणाम होत नाही. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे पेट्रोलच्या किमती वाढतात. तसेच पेट्रोल डीलर्सला देखील कमिशन द्यावे लागते, त्यामुळे भारतातील इंधनाच्या किंमती जास्त असतात.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...