पेट्रोल पंपांवर UPI पेमेंटचा ₹5 चार्ज हटणार? डीलर्सच्या मागणीवर पेट्रोलियम मंत्रालयाचं मोठं स्पष्टीकरण, काय सांगितलं?
Petrol Pump UPI Charge: पेट्रोल भरताना UPI वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ₹5 चा चार्ज हटवण्याबाबत सरकारने मोठा खुलासा केला आहे.

यूपीआय शुल्कावरून देशभरात गदारोळ माजला आहे. आता पेट्रोल पंपांवरील यूपीआय शुल्काबाबत एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या यूपीआय पेमेंटवरील 5% एमडीआर काढून टाकण्याच्या पेट्रोल डीलर्सच्या मागणीवर कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही.
पेट्रोलियम मंत्रालयाकडून अर्थ मंत्रालयाला हे ₹5 शुल्क रद्द करण्याबाबत किंवा माफ करण्याबाबत कोणताही औपचारिक प्रस्ताव मिळालेला नाही. याचा अर्थ असा की, 15 ऑक्टोबरपासून जर तुम्ही पेट्रोल पंपावर ₹2,000 पेक्षा जास्त रकमेचे पेट्रोल भरले, तर डीलर्सना एमडीआर लागू राहील. पेट्रोल डीलर्स असोसिएशनने कमी कमिशन आणि वाढत्या खर्चाचे कारण देत हे शुल्क पूर्णपणे काढून टाकण्याची विनंती केली होती.
१५ ऑक्टोबरपासून निवडक UPI द्वारे केलेल्या ₹२,००० पेक्षा जास्त रकमेच्या पेमेंटवर MDR लागू होईल. यामध्ये पेट्रोल पंपांचाही समावेश आहे. पेट्रोल पंप डीलर्सच्या मते, त्यांचे मार्जिन पूर्वनिश्चित असते. जर UPI पेमेंटवर ₹५ शुल्क आकारले गेले, तर त्यांचा खर्च वाढू शकतो. याच कारणामुळे ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने पेट्रोल पंपांना MDR मधून वगळण्याची मागणी केली आहे.
पेट्रोल पंप विक्रेते हे शुल्क हटवण्याची मागणी करत आहेत. परंतु सध्या ₹2,000 पेक्षा जास्त UPI पेमेंटवर आकारले जाणारे ₹5 MDR हटवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. याचा अर्थ हे शुल्क कायम आहे. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की पेट्रोल पंपांवर ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या UPI पेमेंटसाठी आकारले जाणारे ₹5 MDR ग्राहकांकडून वसूल केले जाईल का. तसे होणार नाही. सरकारने स्पष्ट केले आहे की, हे शुल्क पेट्रोल पंप डीलर्सना भरावे लागेल. ग्राहकांना नाही, आणि कोणीही ग्राहकांना हे शुल्क भरण्यास सांगू शकत नाही.
