PhysicsWallah IPO : ती तारीख आलीच ज्याची होती अनेकांना प्रतिक्षा, या तारखेला फिजिक्सवालाचा IPO उघडणार, कोण मालामाल होणार?

शिक्षण क्षेत्रात क्रांती आणणाऱ्या फिजिक्सवालाचा आयपीओ आता उघडणार आहे. ऑनलाईन शिक्षण प्लॅटफॉर्म असलेल्या फिजिक्सवालाने गुंतवणूकदारांना कमाईची संधी दिली आहे. कोण होणार मालामाल?

PhysicsWallah IPO : ती तारीख आलीच ज्याची होती अनेकांना प्रतिक्षा, या तारखेला फिजिक्सवालाचा IPO उघडणार, कोण मालामाल होणार?
फिजिक्सवाला आयपीओ
| Updated on: Nov 07, 2025 | 2:09 PM

PhysicsWallah IPO : फिजिक्सवालाच्या IPO ची बाजारात कोण प्रतिक्षा होती. ऑनलाईन शिक्षण प्लॅटफॉर्म फिजिक्सवाल पुढील आठवड्यात 11 नोव्हेंबर रोजी 3480 कोटी रुपयांचा IPO बाजारात आणत आहे. कंपनीने रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) दाखल केले आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी अँकर बुकिंगसाठी 10 नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. तर आयपीओचा सार्वजनिक इश्यू 13 नोव्हेंबर रोजीपर्यंत सर्व गुंतवणूकदारांसाठी खुला राहील.

पुढील आठवड्यात BSE आणि NSE वर

ही शैक्षणिक कंपनी 14 नोव्हेंबरपर्यंत IPO शेअर वाटप प्रक्रिया पूर्ण करेल. तर 18 नोव्हेंबरला BSE आणि NSE वर शेअर ट्रेड करेल. ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून बाजारातून 3,100 कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे. प्रमोटर्स अलख पांडे आणि प्रतिक बूब हे ऑफर-फॉर-सेलद्वारे 380 कोटी रुपयांचे शेअर विकतील. फिजिक्सवाला प्लॅटफॉर्म स्पर्धात्मक परीक्षा तयारीसाठी टेस्ट कोर्स आणि अपस्किलिंग कोर्सची विक्री करते. तर देशातील अनेक शहरात फिजिक्सवाला क्लासेसच्या शाखा आहेत.

कंपनीत कुणाचा किती वाटा?

या कंपनीत दोन प्रमोटर्सचा सामान 80.62 टक्के वाटा आहे. तर सार्वजनिक शेअरधारकांकडे 19.38 टक्के शेअर आहेत. त्यात वेस्टब्रिज AIF कडे 6.40 टक्के वाटा, हॉर्नबिल कॅपिटल पार्टनरकडे 4.41 टक्के, GSV व्हेंचर्स फंडकडे 2.85 टक्के आणि लाइट्सपीड अपॉर्च्युनिटी फंडकडे 1.79 टक्के इतका वाटा आहे.

IPO द्वारे जमा पैशांचा वापर कशासाठी?

आयपीओतून जमा झालेल्या पैशांचा वापर विविध खर्चासाठी आणि भाडे देण्यासाठी करण्यात येईल. कंपनीचे अनेक शहरात शैक्षणिक आऊटलेट आहे. तर उत्कर्ष क्लासेस अँड एडुटेकच्या ऑफलाईने केंद्राच्या किरायासाठी 28 कोटी रुपये, त्यातील हिस्सेदारीपोटी 26.5 कोटी रुपये वापरण्यात येतील. जमा झालेला पैसा सर्व्हर आणि क्लाऊडशी संबंधित पायाभूत सुविधांसाठी खर्च करण्यात येणार आहे.

अनेक गुंतवणूकदार या आयपीओसाठी इच्छुक आहे. भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील पाच बड्या कंपन्यांपैकी फिजिक्सवाला एक मानण्यात येते. अलख पांडे आणि प्रतीक बूब यांनी 2020 मध्ये फिजिक्सवाला सुरु केले होते आणि अवघ्या पाच वर्षांत त्यांनी साम्राज्य स्थापन केले. या कंपनीला जून 2025 मधील तिमाहीत 152 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर एका आर्थिक वर्षात महसूल 33.3 टक्क्यांनी वाढून 847 कोटी रुपयांवर पोहोचला, यापूर्वी हा आकडा 635.2 कोटी रुपये इतका होता.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही क्रिप्टो करन्सीत स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.