Insurance : सरकारी विमा योजनांसाठी मोजा अधिक रक्कम, हप्त्यात झाली वाढ, तुमच्या खिशावर किती पडेल ताण?

| Updated on: Dec 06, 2022 | 7:49 PM

Insurance : सरकारी विमा योजनांसाठी आता अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.

Insurance : सरकारी विमा योजनांसाठी मोजा अधिक रक्कम, हप्त्यात झाली वाढ, तुमच्या खिशावर किती पडेल ताण?
विमा महागला
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PM Jeevan Jyoti Bima Yojana) आणि पीएम सुरक्षा विमा योजना (PM Suraksha Bima) यापैकी तुम्ही एकाचा फायदा घेत असला तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या लोककल्याणकारी योजनांचा प्रीमियम केंद्र सरकारने वाढविला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आता या विमा योजनेच्या हप्त्यासाठी जादा रक्कम मोजावी लागणार आहे. त्याचा थोडाफार भार खिशावर पडणार आहे.

या योजनांचा हप्ता कमी आहे. त्यात सरकारने फार मोठी वाढ केलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्याचा या निर्णयाचा फार मोठा फटका बसणार नाही. परंतु, निर्णयानुसार अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे. अर्थात त्याची फार मोठी झळ विमाधारकांना बसणार नाही.

केंद्र सरकारने या दोन्ही योजनांसाठीच्या हप्त्यात 1.25 रुपयांची वाढ केली आहे. या दोन्ही योजना जीवन सुरक्षेशीसंबंधित आहेत. या योजनेत अत्यंत कमी प्रीमियममध्ये तुम्ही 4 लाख रुपयांपर्यंतचा विमा घेऊ शकता. आता योजनेसाठी ग्राहकांना जादा रक्कम मोजावी लागेल.

हे सुद्धा वाचा

जर तुम्ही या दोन्ही योजनांचे लाभधारक असाल तर आता तुम्हाला अधिकचा प्रीमियम चुकता करावा लागणार आहे. पूर्वी या योजनेत संयुक्तपणे 342 रुपये वार्षिक द्यावे लागत होते, आता ही रक्कम वाढून 456 रुपये झाली आहे. या योजनेसाठी सरकारी बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना हा टर्म इन्शुरन्स प्लॅन आहे. या योजनेत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, वारसदाराला 2 लाख रुपये मिळतात. यामध्ये 18-50 वर्षाची कोणतीही व्यक्ती विमा खरेदी करु शकते. योजनेसाठी तुम्हाला 436 रुपये वार्षिक मोजावे लागतात. एका वर्षासाठी ही विमा योजना आहे.

या योजनेत विमाधारकाचा मृत्यू ओढावल्यास, तो अपंग झाल्यास त्याला 2 लाख रुपयांपर्यंतचा फायदा होतो. ही रक्कम वारसाला देण्यात येते. विमाधारक अपंग झाल्यास त्याला 1 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळते.

या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांचे वय कमीत कमी 18 वर्षे तर जास्तीत जास्त 70 वर्षे इतके आहे. या योजनेसाठी ठरलेल्या विमा हप्त्यात आता वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना फार मोठा फटका बसणार नसला तरी अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.