कोट्यवधी शेतकरी अर्ज करुनही PM Kisan Scheme पासून वंचित, आता काय करायचं?

| Updated on: Dec 29, 2020 | 12:20 PM

किसान सन्मान योजनेचा अर्ज करुनही शेतकऱ्यांना स्पेलिंगमधील चुकांमुळे एकही रुपया मिळालेला नाही.(PM Kisan Samman Nidhi Scheme)

कोट्यवधी शेतकरी अर्ज करुनही PM Kisan Scheme पासून वंचित, आता काय करायचं?
पीएम किसानचा हप्ता घेणाऱ्या शेतकऱ्यांना मिळू शकतो पेन्शन लाभ
Follow us on

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 डिसेंबरला पीएम-किसान सन्मान निधीचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. देशभरातील 11 कोटी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ होत आहे. मात्र, 1.44 कोटी शेतकऱ्यांना अर्ज करुनही किसान सन्मान योजनेचा एकही रुपया मिळालेला नाही. शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांमध्ये साम्य न आढळल्यानं त्यांना या सुविधेचा लाभ मिळालेला नाही. आधार आणि इतर कागदपत्रांवरील माहिती जुळत नसल्यामुळे या शेतकऱ्यांच्या अर्जाचे वेरिफिकेशन करण्यात आलेला नाही. कृषी मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान योजनेच्या अर्जदारांच्या बँक अकाऊंट नंबर, नावामधील स्पेलिंगमध्ये फरक असल्यामुळे वेरिफिकेशन झालेले नाही. (PM Kisan Samman Nidhi Scheme more than one crore farmers not get money)

शेतकऱ्यांना काय करावं लागेल?

जर शेतकऱ्यांच्या आधार कार्डवरील माहिती आणि इतर कागदपत्रांवरील स्पेलिंगमध्ये फरक असेल तर आधारमधील माहिती दुरुस्त करावी लागेल. त्यानंतर नवं आधारकार्ड किसान सन्मान योजनेच्या पोर्टलवर अपडेट करावेल लागेस. किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटवर फार्मर कॉर्नरवर जाऊन हे काम करावं लागेल. त्यानंतर Edit Aadhar Details हा पर्याय निवडावा लागेल. या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकून त्यानंतर कॅप्चा कोड टाकावा लागेल.

कृषी मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जर नाव चुकीचे असेल तरच ते वेबसाईटवरुन दुरुस्त करता येईल. मात्र, इतर दुरुस्त्या असतील तर त्या लेखपाल आणि कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन दुरुस्त कराव्या लागतील.

उत्तर प्रदेशातील जवळपास सव्वा लाख शेतकऱ्याचा डाटा वेरिफिकेशन झालेला नाही. शेतकऱ्यांना आधार आणि इतर कागदपत्रांतील त्रुटींमुळे किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत नाही. ज्यावेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा डाटा वेरिफाई करुन केंद्र सरकारकडे पाठवते तेव्हाच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत 14.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याचा केंद्र सरकारचं लक्ष्य आहे. ही योजना सुरु होऊन दोन वर्ष होत आली आहेत. मात्र, 11.45 कोटी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. किसान सन्मान योजनेच्या पोर्टलवर शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांमधील त्रुटी हे देखील त्याचे एक कारण असू शकते. या योजनेचे वार्षिक बजेट 75 हजार कोटी रुपये आहे. शेतकरी स्वत: या योजनेच्या पोर्टलवर नोंदणी करु शकतात.

संबंधित बातम्या:

किसान सन्मान निधीचे पैसे मिळाले नसतील तर आजच करा ‘या’ गोष्टी

गणेशजी खरं खरं सांगा, कमाई जास्त कुठे? लातूरच्या शेतकऱ्याला मोदींचा लाईव्ह सवाल

(PM Kisan Samman Nidhi Scheme more than one crore farmers not get money)