
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 75 वर्षांचे झाले. त्यांचा आज वाढदिवस (PM Modi Happy Birthday) आहे. 2014 पासून ते देशाचे नेतृत्व करत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार तिसऱ्यांदा सत्ता स्थानी आले आहे. कुणी वंदा, कुणी निंदा, पण जो वसा घेतलेला आम्ही त्याच मार्गावरून जाणार हे या सरकारचं ब्रीदवाक्य आहे. त्यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक साहसी निर्णय घेतले आहे. 370 कलम हटवणं असो वा पाकिस्तानला धडा शिकवणं असो, अथवा अशात अमेरिकेशी पंगा घेणे असो मोदी सरकारने काही निर्णयात कुठलीच तडजोड केलेली दिसत नाही. त्यांच्या निर्णयावर प्रचंड टीका करण्यात येते. पण हे सरकार निर्णय घेण्यात मागे हटत नाही. 2014 पासून या सरकारने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आणि त्याचे चांगले-वाईट असे दोन्ही परिणाम सर्वांसमोर आहेत. त्यांच्या काही धाडसी निर्णयाचं विरोधकांनी पण कौतुक केले आहे. तर वेळप्रसंगी टीकेची झोड सुद्धा उठवली आहे. त्यांच्या काळात कोणत्या योजना गाजल्या, त्याची माहिती घेऊयात… ...