AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Post Office ची जबरदस्त योजना; 115 महिन्यात पैसे डबल होतील, सरकारकडूनही जुने नियम कायम

investment tips : पोस्ट ऑफिसच्या एका योजनेत गुंतवणूक करून पैसे डबल करण्याची सुवर्णसंधी आहे. परंतु या योजनेतून मिळालेलं व्याज करपात्र आहे.

Post Office ची जबरदस्त योजना; 115 महिन्यात पैसे डबल होतील, सरकारकडूनही जुने नियम कायम
| Updated on: Jul 07, 2026 | 6:38 PM
Share

तुम्हाला 115 महिन्यांत 1 लाख रुपयांचे 2 लाख रुपये मिळाल्यास संशय वाटेल. परंतु ही योजना कोणत्याही खासगी बँक किंवा विमा कंपनी नाही. तर सरकारी पोस्ट ऑफिसची ही योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याआधी सर्व नियम जाणून घ्या. तुम्हाला कोणत्याही प्रकारची जोखीम न घेता पैसे दुप्पट करायचे आहे. तर पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र ही योजना चांगला पर्याय आहे. सरकारने जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी व्याजदर जारी केले आहेत. या योजनेतून 1 लाखांचे 2 लाख कसे होतील, जाणून घेऊयात.

केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि आर्थिक व्यवहार विभागाने जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी व्याजदर 7.5 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. हा दर एप्रिल 2023 पासून तसाच आहे. या योजनेतून गुंतवणूकदारांना कोणत्याही जोखमीशिवाय हमीयुक्त परतावा मिळतो.

सध्या व्याजदर 7.5 टक्के प्रति वर्ष व्याजदराने किसान विकास पत्रामध्ये गुंतवलेली रक्कम 115 महिन्यात दुप्पट होते. गुंतवणुकीच्या वेळी प्रमाणपत्रावर मुदत कालावधी आणि मिळणारी रक्कम छापलेली असते. या योजनेत गुंतवणूक करणे सोपे आहे. कोणताही प्रौढ व्यक्ती एकत्र किंवा अल्पवयीन/गतीमंद व्यक्तीच्या वतीने पालक देखील खाते उघडू शकता. तसेच 10 वर्ष व त्याहून अधिक वयाची मुले देखील स्वत:च्या नावाने खाते उघडू शकतात. खरंतर किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करण्यासाठी खूप कमी रक्कम लागते. तुम्ही फक्त 1000 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. विशेष म्हणजे गुंतवणुकीवर कोणतीही कमाल मर्यादा नाही.

योजनेतून मिळालेलं व्याज करपात्र

खाते उघडण्यासाठी ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा यांसारखी महत्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. तुमची गुंतवणूक ही 50000 रुपयांपेक्षा अधिक असेल, तर तुम्हाला पॅन (PAN) देणे अनिवार्य असेल. तुम्ही 10 लाखांहून अधिक रक्कम जमा केली तर तुम्हाला पगाराची स्लिप किंवा आयटीआर यांसारखा उत्पन्नाचा पुरावा दाखवावा लागेल. या योजनेत हमीयुक्त परतावा दिला जातो, परंतु यात कोणत्याही प्रकारचा कर लाभ मिळत नाही. तसेच योजनेत मिळालेलं व्याज करपात्र आहे. तसेच ही गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत येत नाही.

Follow Us
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी