Child Saving Plan: योजनाच अशी भारी, जनहितमें जारी; रोज जमा करा फक्त 67 रुपये अन् 5 वर्षात व्हा लखपती!

| Updated on: Jul 02, 2022 | 6:08 PM

RD Plan: एक अशी योजना जी तुमच्या मुलांच्या अथवा तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. रोज केवळ 67 रुपये आणि महिन्याला 2010 रुपये जमा करुन तुम्ही अवघ्या पाच वर्षांत लखपती व्हाल

Child Saving Plan: योजनाच अशी भारी, जनहितमें जारी; रोज जमा करा फक्त 67 रुपये अन् 5 वर्षात व्हा लखपती!
असे व्हा लखपती
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

‘थेंबे थेंबे तळे साचे’ अशी मराठीत एक म्हण आहे.असं कुठं होतं का? असं म्हणतं आपण अनेकदा या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.किंवा सांगणा-याला मुर्खात काढतो. पण तुमची एक कृती तुम्हाला लखपती (Lakhapati) बनवू शकते. पोस्ट ऑफिस अनेक अल्पबचत योजना (Small Saving Scheme) चालविते. या बचत योजनांमध्ये थोडी थोडी केलेली बचत तुम्हाला भलमोठी रक्कम मिळवून देते. अर्थात ज्यांना झटपट श्रीमंत व्हायचे आहे, त्यांच्यासाठी हा राजमार्ग नाही. पण ज्यांना नियमीत बचत करायची आहे, त्या गुंतवणुकदारांना (Investor) या बचत योजना फायदेशीर ठरतात. पोस्टाची (Post Office) अशीच एक योजना म्हणजे आवर्ती ठेव योजना (Recurring Deposit).या योजनेत नियमीत रक्कम जमा केली तर ग्राहकाला एका ठराविक कालावधीनंतर व्याजासहित चांगला परतावा हाती येतो. केवळ 67 रुपयांच्या रोजच्या बचतीतून ही किमया साधता येते. रोजच्या बचतीतून महिन्याकाठी 2010 रुपये जमा होतात आणि त्यातून वर्षाला ही मोठी बचत होते.

पोस्ट खात्यात उघडा आरडी

देशात अल्पबचत योजनांसाठी पोस्ट कार्यालय हा सर्वात चांगला पर्याय आहे. पोस्ट कार्यालयातील अनेक योजनांमध्ये भारतीय डोळे झाकून गुंतवणूक करतात. विश्वास आणि रक्कमेची हमी ही त्यामागील कारणे आहेत. देशभरात 1.5 लाखांहून अधिक पोस्ट ऑफिस आहेत. त्यामुळे ग्राहकांना सहज पोस्ट कार्यालयात जाऊन बचत योजनांमध्ये गुंतवणूक करता येते. पोस्ट खात्यातील अल्बचत योजनांमध्ये आवर्ती ठेव योजना हा बचतीचा चांगला पर्याय आहे. पाच वर्षांच्या या योजनेत दर महिन्याला एक निश्चित रक्कम जमा करुन तुम्हाला लखपती होता येते. ही योजना तुम्ही मुलाच्या शिक्षणासाठी अथवा एखाद्या उद्देशासाठी काढू शकता. पाच वर्षानंतर व्याजासहित मिळणारी रक्कम तुम्हाला लखपती करेलच, पण तुम्हाला ज्या कामासाठी ही रक्कम हवी आहे, त्यात ही मोठा आर्थिक हातभार लागेल.

हे सुद्धा वाचा

महिन्याला जमा करा फक्त दोन हजार

पोस्ट खात्याच्या आरडीवर सध्या 5.8 टक्क्याने व्याज मिळते. नियमीत बचत खात्यापेक्षा आवर्ती ठेव योजनेवर अधिकचे व्याज मिळते. या योजनेवर दर तीन महिन्याला व्याज मिळते. ही रक्कम तुमच्या रक्कमेत जमा होते आणि पुन्हा चक्रवाढ व्याजाने गुंतवलेल्या रक्कमेवर व्याज मिळते. हे चक्र पुढील पाच वर्षे सुरु राहते. जर तुम्ही दर दिवशी 67 रुपये जमा केले तर महिन्याला 2010 रुपये जमा करावे लागतील. पाच वर्षांचा विचार केला तर तुम्ही 1.20 लाख रुपये या योजनेत जमा कराल. त्यावर चक्रवाढ व्याजाने ही एक रक्कम तुम्हाला प्राप्त होईल. ही रक्कम तुमच्या उद्देशपुर्तीसाठी वापरता येईल.