AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Post Office Saving Scheme : सरकारने गुंतवणुकदारांच्या तोंडाला पानं पुसली हो ! अल्पबचत योजनांचे व्याजदर ‘जैसे थे’, गोपीनाथ समितीच्या सूचनांना हरताळ

Small Saving Scheme : अल्पबचत योजनांमधील गुतवणुकदारांना गुंतवणुकीवर जबरदस्त परतावा मिळण्यासाठी पुन्हा प्रदीर्घ वाट पहावी लागणार आहे. सरकारने गुंतवणुकदारांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. NSC, PPF आणि सुकन्या समृद्धी योजनांचे व्याजदर वाढण्याची शक्यता शक्यताच राहिली.

Post Office Saving Scheme : सरकारने गुंतवणुकदारांच्या तोंडाला पानं पुसली हो ! अल्पबचत योजनांचे व्याजदर 'जैसे थे',  गोपीनाथ समितीच्या सूचनांना हरताळ
व्याजदर जैसे थे Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 01, 2022 | 3:25 PM
Share

पोस्ट खात्याच्या अल्पबचत योजनांमध्ये(Post Office Small Saving Scheme) गुंतवणूक करणा-या गुंतवणुकदारांसाठी अधिकचा परतावा मिळण्याची आशा धूसर झाली. सरकारने या अल्पबचत योजनांमधील गुंतवणुकदारांना कसलाही दिलासा दिला नाही. गोपीनाथ समितीने (Gopinath Committee) 2011 मध्ये अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढीची शिफारस केली होती.  अल्प बचत योजनांचे व्याजदर सरकारी रोख्यांच्या उत्पन्नापेक्षा (Government Bond Yield) 25 ते 100 बेसिस पॉइंट्सने जास्त झाले की, या योजनांमधील व्याजदर वाढवावा असे हे समीकरण आहे. रोखे उत्पनाचा त्यासाठी आधार  घेण्यात येतो. सध्या रोख्यातील उत्पन्नात 140 आधार अंकांची वाढ झाली आहे. वाढती महागाई आणि बँकांचे व्याजदर वाढत असल्याने रोख्यातील उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम आता अल्पबचत योजनांमध्येही दिसून येणार अशी आशा होती. सरकार या योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर व्याजदर वाढवेल, असे मानण्यात येत होते. 1 जुलै नंतर जोखीम न घेणा-या गुंतवणुकदाराला सरकार व्याजदर वाढीचे सूख देईल अशी आशा होती, सरकारने ही आशा फोल ठरवत, अल्पबचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आणि गुंतवणुकदारांना झटका दिला.

काय आहे गोपीनाथ समितीचे सूत्र?

2011 मध्ये गोपीनाथ समितीने याविषयीचे सूत्र मांडले. त्यानुसार अल्पबचत योजनांमधील बचतीचा व्याजदर हा त्या कालावधीच्या सरकारी रोख्यांच्या सरासरी उत्पन्नापेक्षा 25-100 बेसिस पॉइंट्स जास्त असावेत. बेंचमार्क 10-वर्षीय रोखे उत्पन्न गेल्या 12 महिन्यांत 6.04% वरून 7.46% वर 140 आधार अंकांनी वाढले आहे. एप्रिल-जून तिमाहीत त्याची सरासरी 7.31% आहे. या आधारावर, सूत्रानुसार, PPF दर 7.81% पर्यंत वाढवला पाहिजे, तर सुकन्या समृद्धी योजना(Sukanya Samriddhi Yojana) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSY) 8% पेक्षा जास्त व्याजदर सरकारने दिला पाहिजे.

सध्या NSC म्हणजेच राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर 6.80 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के आणि ज्येष्ठ नागरिक कर बचत योजनेवर 7.40 टक्के व्याज मिळत आहे.सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर (PPF) 7.1 टक्के वार्षिक व्याज दर मिळते, किसान विकास पत्रावर (KVP) 6.90 टक्के व्याज मिळत आहे. एक वर्षांच्या मुदत ठेव योजनेवर 5.5 टक्के व्याजदर, एक ते पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर 5.5-6.7 टक्के व्याजदर आणि पाच वर्षांच्या ठेव योजनेवर 5.8 टक्के व्याज दर मिळत आहे.

सरकारने व्याजदर वाढवला नाही 2020-21 वर्षाच्या पहिल्या तिमाहीपासून अल्प बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यानुसार,अल्प बचत योजनांवर यापूर्वी मिळणारा व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे. त्यात काहीही बदल करण्यात आलेला नाही. गुरुवारी सरकारने या योजनांच्या व्याजदरात कसलाही बदल न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे देशभरातील लाखो गुंतवणुकदार हिरमुसले.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?