
तुम्हाल फक्त आणि फक्त 436 रुपये भरायचे आहे. यात तुम्हाला सरकार 2 लाखांचा विमान देत आहे. यासाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमान योजना नेमकी काय आहे, त्याचे किती पैसे नेमके भरावे लागतात, याविषयीची सविस्तर माहिती पुढे जाणून घेऊया.
विमा हा जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीने विम्याला महत्त्व देताना विमा घेतलाच पाहिजे, परंतु काही लोक विम्याच्या हप्त्याला फालतू खर्च मानतात आणि विमा घेण्यास कचरतात, परंतु प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही एक सरकारी योजना आहे ज्यामध्ये सरकार केवळ 436 रुपयांच्या प्रीमियमसह लोकांना 2 लाख रुपयांपर्यंतचा जीवन विमा देत आहे. अशा वेळी विम्याचे हप्ते व्यर्थ समजणाऱ्यांसाठी ही योजना उत्तम आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेबद्दल चला तर मग जाणून घेऊया.
पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना केंद्र सरकारने सन 2015 मध्ये सुरू केली होती. प्रत्येक कुटुंबाला विम्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे लोकांना केवळ 439 रुपयांच्या वार्षिक प्रीमियमसह 2 लाख रुपयांचा जीवन विमा मिळतो. गरीब लोकही या योजनेत अर्ज करून आपल्या प्रियजनांचे भवितव्य सुरक्षित करू शकतात.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत 18 ते 50 वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती अर्ज करू शकते आणि विमा घेऊ शकते. विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना आणि नॉमिनीला 2 लाख रुपयांची विमा रक्कम दिली जाते. मृत्यूच्या कारणांमध्ये नैसर्गिक आणि अपघाती अशा दोन्ही कारणांचा समावेश आहे. त्याचबरोबर कोणत्याही आजारामुळे मृत्यू झाल्यास विम्याचा लाभही मिळतो.
पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेसाठी तुम्ही कोणत्याही सरकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अर्ज करू शकता.
यात लक्ष्यात घेण्यायासाठी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला कमी किमतीत अधिकाधिक फायदे देणारा हा विमा आहे. तेही खूप कमी किमतीत तुम्हाला 2 लाखांचा विमा मिळतो आहे. त्यामुळे तुम्ही विमा काढला नसेल तर हा विमा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)