AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Rate Today : 1 जूनपासून मोठा बदल, कुठे महाग तर कुठे स्वस्त, पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव काय

Petrol Diesel Rate Today : जागतिक बाजारात कच्चा तेलाची स्वस्ताई आहे. 1 जूनपासून मोठे बदल झाले. कोणत्या शहरात झाले महाग, तर कुठे झाले स्वस्त, जाणून घ्या भाव

Petrol Diesel Rate Today : 1 जूनपासून मोठा बदल, कुठे महाग तर कुठे स्वस्त, पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव काय
आजचा भाव काय
| Updated on: Jun 01, 2023 | 8:27 AM
Share

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलाने (Crude Oil) मोठा दिलासा दिला. भारतीय तेल विपणन कंपन्या युरोपला कच्चा तेलाचा पुरवठा करत आहे. त्यातून त्यांना कमाई होत आहे. भाव उतरल्याचा फायदा या कंपन्यांना मिळत आहे. डॉलर मजबूत झाल्याने कच्चा तेलाच्या किंमती घसरणीवर आहे. भारतीय सर्वसामान्य ग्राहकांना अजूनही किंमतीविषयी दिलासा मिळाला नाही. एक लिटर पेट्रोल-डिझेलसाठी (Petrol Diesel Price) राज्यातील वाहनधारकांना इतके रुपये मोजावे लागतील. वाहनधारकांना त्यांच्या शहरातील इंधनाची किंमत एका एसएमएसवर जाणून घेता येईल.

इंधन होईल स्वस्त सूत्रांच्या माहितीनुसार. पेट्रोल-डिझेलच्या किंमती लवकरच कमी होतील. पुढील 6 महिन्यात हळूहळू पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होतील. तज्ज्ञांच्या मते, सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 20 रुपयांची कपात होण्याची संभावना आहे. ही कपात एकदाच होणार नाही. तर टप्प्याटप्प्याने ही कपात करण्यात येईल.

जून महिन्यात पहिली कपात मे महिन्यात कर्नाटक राज्यातील निवडणूक आहे. त्यानंतर 4 राज्यातील निवडणूका होतील. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणूका होत आहे. त्यामुळे केंद्र सरकार पेट्रोल-डिझेल कार्ड खेळण्याच्या तयारीत आहे. याच कालावधीत इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे.

कच्चा तेलाची घसरगुंडी आज 1 जून रोजी, कच्चा तेलाच्या किंमती घसरल्या आहेत.  डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) आता 68.23 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा (Brent Crude Oil) भाव 72.81 डॉलर प्रति बॅरल झाले.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.36 तर डिझेल 92.88 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 106.57 तर डिझेल 93.11 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.40 पेट्रोल आणि डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.43 आणि डिझेल 92.95 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.51 आणि डिझेल 93.05 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.45 तर डिझेल 93.93 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.63 तर डिझेल 93.16 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.37 तर डिझेल 94.85 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.56 रुपये आणि डिझेल 93.07 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 108.76 तर डिझेल 95.20 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.79 आणि डिझेल 93.28 रुपये प्रति लिटर
  14. रायगड पेट्रोलचा भाव 106.44 आणि डिझेल 92.91 रुपये प्रति लिटर
  15. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.60 रुपये तर डिझेल 93.12 रुपये प्रति लिटर
  16. ठाणे पेट्रोलचा दर 105.74 रुपये तर डिझेल 92.24 रुपये प्रति लिटर

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?