AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akash Ambani Daughter: मुकेश अंबानी झाले पुन्हा आजोबा, आकाश-श्लोका यांच्या कुटुंबात मुलीचा जन्म

मुकेश अंबानी यांच्या एंटीला घरी नव्या परीने जन्म घेतला. यासह आकाश-श्लोका यांचा मुलगा पृथ्वी अंबानीला लहान बहीण मिळाली.

Akash Ambani Daughter: मुकेश अंबानी झाले पुन्हा आजोबा, आकाश-श्लोका यांच्या कुटुंबात मुलीचा जन्म
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Jun 01, 2023 | 5:46 AM
Share

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी नव्या परीने दस्तक दिली. आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांना दुसऱ्यांदा मुलगी झाली. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांच्या एंटीला घरी नव्या परीने जन्म घेतला. यासह आकाश-श्लोका यांचा मुलगा पृथ्वी अंबानीला लहान बहीण मिळाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आकाश आणि श्लोका यांच्या कुटुंबात नव्या परीने इंट्री केली. बुधवारी मुलीचा जन्म झाला. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांनी आपला मुलगा आकाश अंबानी आणि नातू पृथ्वी अंबानी यांच्यासोबत सिद्धी विनायकाचे दर्शन घेतले.

श्लोकाच्या बेबी बंबची चर्चा

काही दिवसांपूर्वी अंबानी परिवारातील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची सुरुवातीच्या वेळी एकावेळी दिसला होता. तेव्हा आकाश अंबानी यांच्यासोबत श्लोका मेहता पोहचल्या होत्या. त्यावेळी श्लोका या बेबी बंप प्लांट करताना दिसत होत्या. त्यातल्या त्यात आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या पहिला मुलगा पृथ्वी अंबानी याला दोन वर्षे झाली आहेत. आकाश आणि श्लोका यांचे लग्न ९ मार्च २०१९ ला झाले होते. पृथ्वीचा जन्म डिसेंबर २०२० ला झाला.

ईशा अंबानी यांना झाले जुळे

अंबानी परिवारात आनंदाची बाब २०२२ मध्ये घडली. मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी यांना जुळे झाले. ईशा अंबानी आणि आकाश अंबानी हेसुद्धा ट्वीन बेबीज आहेत. आकाश अंबानी आणि श्वेता मेहता यांच्या दुसऱ्या बाळाबद्दल अंबानी परिवाराकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आला नाही. परंतु, सध्या सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे.

कुणाकडे कोणता व्यवसाय

आकाश अंबानी रियायन्स समूह टेलिकॉम आणि डिजिटल बिझनेस पाहतात. मुकेश अंबानी हळू-हळू आपला व्यवसाय मुलाकडे सोपवत आहेत. यात रियायन्स जिओचा कारभार मुकेश अंबानी, रिलायन्स रिटेल ईशा अंबानी आणि रियालय्न न्यू एनर्जीचा कारभार अनंत अंबानी यांना मिळणे जवळपास निश्चित झाले आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान