
Ratan Tata Endowment Foundation : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी त्यांचे इच्छापत्र, मृत्यूपूत्र लिहिले होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती आणि इतर वस्तूंची वाटणी तशी करण्यात आली होती. पण काही शेअरविषयी त्यांनी काही लिहिलेले नव्हते. हे शेअर कुणाला द्यायचे याची इच्छापत्रात माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे हे शेअर कुणाच्या मालिकीचे आहेत, हा प्रश्न निर्माण झाला होता. प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहचले. रतन टाटा यांच्या सूचीबद्ध आणि असूचीबद्ध शेअरच्या मालिकीविषयी हायकोर्टाने निकाल दिला आहे. त्यानुसार,
रतन एंडाउमेंट फाऊंडेशन आणि रतन टाटा एंडाउमेंट ट्रस्ट यांच्याकडे या शेअरची मालकी गेली आहे. न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या एकलपीठाने याविषयीचा निकाल दिला.
रतन टाटा यांच्या संस्थांची मालकी
रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रात ज्या वस्तू, शेअरची माहिती देण्यात आली नव्हती. अथवा त्याच्या मालकीविषयी काहीच माहिती देण्यात आली नव्हती. त्यावर त्यांनीच स्थापन केलेल्या संस्थांचा अधिकार असावा असे निरीक्षण एकलपीठाने नोंदवले. रतन टाटा यांनी रतन टाटा एंडाउमेंट फाऊंडेशन आणि रतन टाटा एंडाउमेंट ट्रस्टची स्थापना केली होती. त्यात रतन टाटा यांच्याकडील काही लिस्टेड आणि अनलिस्टेड शेअर्स, याची माहिती त्यांच्या मृत्युपत्रात नव्हती. आता हे शेअर त्यांच्या या दोन्ही संस्थांना समानरुपात विभागून देण्याचा निकाल हायकोर्टाने दिला. याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून निर्णय देण्याची विनंती करण्यात आली होती.
मृत्यूपत्रात करण्यात आली होती दुरुस्ती
या शेअरविषयी रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात काहीच उल्लेख केला नसल्याचे न्यायालयाच्या समोर आणण्यात आले. पण 22 डिसेंबर 2023 रोजी एक दुरुस्ती करण्यात आली होती. ही सुधारीत अतिरिक्त माहिती मृत्यूपत्रात जोडण्यात आली होती. त्यात रतन टाटा यांची इतर सर्व संपत्तीचे समान वाटप करून त्यांनी स्थापन केलेल्या दोन ट्रस्टला सोपविण्यात यावे अशी दुरुस्ती करण्यात आली होती. त्यात सूचीबद्ध आणि असूचीबद्ध शेअर्सचा समावेश करण्यात आला. रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले होते. त्यांचा वारस नव्हता. ते अविवाहित होते. त्यांच्यानंतर त्यांच्या चुलत भावाकडे समूहाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.