Raymond Family चा घरचा वाद रस्त्यावर; प्रसिद्ध उद्योगपती पत्नीला देणार घटस्फोट

रेमंड कंपनीचे सर्वेसर्वा गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज दोघे विभक्त होत आहेत. 32 वर्षाच्या सुखी संसारानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. गौतम आणि नवाज यांना दोन मुली आहेत. दोन्ही मुली मोठ्या आहेत. असं असतानाही या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे.

Raymond Family चा घरचा वाद रस्त्यावर; प्रसिद्ध उद्योगपती पत्नीला देणार घटस्फोट
gautam singhania and wife nawaz modi ( yellow dress)
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Nov 13, 2023 | 9:07 PM

मुंबई | 13 नोव्हेंबर 2023 : देशातील बड्या कार्पोरेट घराण्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. रेमंड फॅमिलीतील हा वाद आहे. रेमंड फॅमिलीतील घरचा वाद हा रस्त्यावर आलाय. रेमंडचे संस्थापक उद्योगपती विजयपत सिंघानिया आणि त्यांच्या मुलांचा वाद नेहमीच मीडियात चर्चेत राहिला आहे. आता कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी यांच्यातील वाद समोर आला आहे. हे दोघे पती-पत्नी लवकरच एकमेकांपासून विभक्त होणार आहेत.

गौतम सिंघानिया आणि नवाज मोदी यांच्या लग्नाला जवळपास 32 वर्ष झाली आहेत. त्यांच्या दोन मुली आहेत. निहारिका आणि नीसा. पत्नीपासून वेगळं होणार असल्याचं सिंघानिया यांनी म्हटलंय. त्यांनी ट्विटरवर एक दीर्घ आणि भावनिक पोस्ट लिहून ही माहिती दिलीय. तर, दुसरीकडे नवाज यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात त्या रेमंड कुटुंबाच्या जेके हाऊसबाहेर धरणे धरताना दिसत आहे. त्यामुळे या व्हिडीओची सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे.

काय म्हटलंय पोस्टमध्ये?

यावर्षीची दिवाळी गेल्या काही वर्षांसारखी नव्हती. 32 वर्ष आम्ही पती-पत्नी म्हणून एकत्र राहिलो. आई-बाप बनलो. नेहमीच एक दुसऱ्याची ताकद बनलो. आम्ही कमिटमेंट आणि विश्वासाने आयुष्यभर वाटचाल केली. याच काळात आमच्या आयुष्यात आमच्या दोन मुलींचा जन्म झाला.

पण गेल्या काही वर्षापासून काही अघटीत घटना घडल्या. आमच्या सुखी संसारावर उठलेल्या आमच्या हितचिंतकांनी गॉसिप आणि अफवांना पेरण्यास सुरुवात केली. त्यामुळे मी आणि नवाजने इथून पुढचं आयुष्य वेगवेगळया मार्गाने जायचं ठरवलं. आम्ही दोघे भलेही विभक्त होत असू पण आमच्या हिऱ्यासारख्या मुलींकरिता आम्ही जे सर्वोत्तम आहे, तेच करणार आहोत. आमच्या या खासगी निर्णयाचा तुम्ही सन्मान कराल ही आशा आहे. या नात्याशी संबंधित बंधन पूर्वपदावर येण्यासाठी आम्ही वेळ देणार आहोत. कठिण प्रसंगात तुमची आणि संपूर्ण कुटुंबाचे आशीर्वाद हवे आहेत, इतकचं.

गौतम सिंघानिया यांचे ट्वीट –

व्हायरल व्हिडिओत काय?

एकीकडे गौतम सिंघानिया यांची पोस्ट व्हायरल होत असतानाच त्यांची पत्नी नवाज मोदी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मला आधी पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आलं. त्यानंतर तीन तास मला जेके हाऊसच्या बाहेर तिष्ठत ठेवण्यात आलं. त्यानंतर मला घरात प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली, असा आरोप नवाज या व्हिडीओत करताना दिसत आहेत. नवाज मोदी यांच्यासोबत एक ओळखीची महिलाही दिसत आहे. दोघीही रेमंड हाऊसच्या बाहेर जमिनीवर बसलेल्या दिसत आहे. नवाज या धरणे धरत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण तो खरा की खोटा याची पुष्टी अजून झालेली नाही.