रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, 25 दिवसांत बदलणार Debit-Credit चा नियम

25 दिवसानंतर म्हणजेच 1 जानेवारी 2021 रोजी कॉन्टॅक्टलेस कार्ड पेमेंटच्या (Contactless Card Payment) नियमांनुसार बदर करण्यात येणार आहे.

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, 25 दिवसांत बदलणार Debit-Credit चा नियम
एटीएम कार्डवरील तीन अंकी सीव्हीव्ही क्रमांक का मिटवला पाहिजे? हे आहे मुख्य कारण
Follow us
| Updated on: Dec 06, 2020 | 1:10 PM

नवी दिल्ली : बँकिंग सेवा वापरणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहेत. कारण, नवीन वर्षात तुमच्या डेबिट (Debit) आणि क्रेडिटच्या (Credit) नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. 25 दिवसानंतर म्हणजेच 1 जानेवारी 2021 रोजी कॉन्टॅक्टलेस कार्ड पेमेंटच्या (Contactless Card Payment) नियमांनुसार बदर करण्यात येणार आहे. खरंतर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कॉन्टॅक्टलेस कार्ड पेमेंटची मर्यादा वाढवली आहे. या बदलामुळे तुम्ही कॉन्टॅक्टलेस डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून 5000 रुपयांपर्यंत कोणत्याही पिनशिवाय सहज पेमेंट करू शकता. आतापर्यंत फक्त कॉन्टॅक्टलेस डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून पिनशिवाय जास्तीत जास्त 2,000 रुपये काढता येऊ शकत होते. पण आता याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. (rbi increased limit for contactless card payments so debit credit card rules changes from 1 january 2021)

कॉन्टॅक्टलेस कार्ड म्हणजे काय? जेव्हा तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरून एखादी वस्तू खरेदी केली तर तुम्ही कार्ड PoS मशीनमध्ये घातला आणि त्यानंतर पिन क्रमांक टाकून पुढे व्यवहार करता. यानंतर तुम्हाला बिलही मशीनद्वारे मिळतं. पण कॉन्टॅक्टलेस कार्डला एक चिप जोडलेली असते. ज्याच्यासोबत स्ट्रिप आणि NFC अँटेना असतो. NFC अँटेना संपर्करहित म्हणजेच कॉन्टॅक्टलेस व्यवहार करतो. यासाठी तुम्हाला कार्ज पीओएस मशीनमधून स्वाइप करण्यासाठी आणि एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी चिपचा वापर केला जातो.

अधिक माहितीनुसार, आतापर्यंत कॉन्टॅक्टलेस कार्डमधून 2000 रुपयांहून अधिक व्यवहार पिनशिवाय करता येत नव्हते. मात्र, आता 1 जानेवारी 2021 पासून आपण पिन प्रविष्ट न करता 5 हजार रुपयांपर्यंत पेमेंट करता येणार आहे. या सुविधेमुळे व्यवहार करणं आणखी सोयीचं आणि जलद गतीने होतं. इतकंच नाही तर यामुळे पिन कोणी चोरी करण्याचा धोकाही टळतो. पण अशावेळी आपलं कार्ड कुठेही हरवणार नाही याची काळजी ग्राहकांनी घेतली पाहिजे. (rbi increased limit for contactless card payments so debit credit card rules changes from 1 january 2021)

प्रत्येक डेबिट-क्रेडिट कार्डमध्ये आहे ही सुविधा महत्त्वाचं म्हणजे बँकेने जारी केलेल्या प्रत्येक कार्डमध्ये ही सुविधा असते. जर तुम्हालाही ही ही सुविधा कार्डमध्ये घ्यायची असेल तर कार्डच्या उजव्या बाजूला वाय-फाय नेटवर्कचा लोगो असेल. ते अॅक्टिव्हेट करून घेतलं की तुम्हीही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

इतर बातम्या – 

Alert! पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं असेल तर वेळीच करा ‘हे’ काम, नाहीतर बसेल दंड

रिझर्व्ह बँकेचा RTGS सुविधेबाबत मोठा निर्णय; आता कोणत्याही क्षणी पैसे करता येणार ट्रान्सफर

(rbi increased limit for contactless card payments so debit credit card rules changes from 1 january 2021)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.