AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिझर्व्ह बँकेचा RTGS सुविधेबाबत मोठा निर्णय; आता कोणत्याही क्षणी पैसे करता येणार ट्रान्सफर

सध्याच्या नियमानुसार RTGS सुविधा ही महिन्यातील प्रत्येक दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असते. | RTGS transfer

रिझर्व्ह बँकेचा RTGS सुविधेबाबत मोठा निर्णय; आता कोणत्याही क्षणी पैसे करता येणार ट्रान्सफर
| Updated on: Dec 05, 2020 | 11:20 PM
Share

नवी दिल्ली: देशात डिजिटल बँकिंगला चालना देण्यासाठी आता भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार मोठ्या रक्कमेचे व्यवहार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) सुविधा 24 तास कार्यरत असेल. 14 डिसेंबरपासून या नियमाची अंमलबजावणी होईल. (RTGS to be available 24x7x365 from Dec 2020)

सध्याच्या नियमानुसार RTGS सुविधा ही महिन्यातील प्रत्येक दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असते. तसेच इतर दिवशीही RTGS सुविधेचा वापर सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेतच करता येत होता. मात्र, आता RTGS सुविधा कधीही उपलब्ध असल्याचे ग्राहकांना बँका बंद असतानाही व्यवहार करणे शक्य होणार आहे.

आरटीजीएस म्हणजे काय?

सामान्य ग्राहकांना जेव्हा बँकेतून पैसे हस्तांरित (Transfer) करायचे असतात तेव्हा त्यांना फॉर्म भरावा लागतो. त्यांनंतर काऊंटरवर हा फॉर्म तपासला जातो. त्यानंतर आपण दिलेले पैसे बँक कर्मचारी संबंधित खात्यात जमा करतात. या कामासाठी बराच वेळ लागतो.

मात्र, आरटीजीएस (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) ही अशी प्रणाली आहे, ज्यामध्ये एका बँकेतून दुसऱ्या बँकेत विनाविलंब रक्कम हस्तांतर करता येऊ शकते. याद्वारे २ लाख रुपये हस्तांतरित करता येऊ शकतात.

गेल्यावर्षीच्या जून महिन्यात रिझर्व्ह बँकेने RTGS आणि NEFT हे दोन्ही व्यवहार निशुल्क केले होते. यापूर्वी फक्त NEFT ही सुविधा 24*7 उपलब्ध होती. एनईएफटी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) च्या माध्यमातून देशातील कोणत्याही बँकेत पैसे हस्तांतर करता येतात.

आरटीजीएस पेमेंटचे फायदे?

आरटीजीएस प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर तुमच्या खात्यातील रक्कम शून्य दिवसात किंवा डिमांड ड्राफ्ट बँकेला सादर केल्यानंतर त्याच दिवशी तुमच्या खात्यात जातो. याद्वारे २ लाख रुपये हस्तांतरित करता येऊ शकतात.

या सुविधेमुळे कॅश ट्रान्सफर, हेडिंग पेमेंट, लोन पेमेंट, सिक्योरिटीज पेमेंट, सप्लायर पेमेंट, टॅक्स पेमेंट, बिझनेस पेमेंट अशी अनेक कामे सहजपणे करता येऊ शकतात. मात्र, या सुविधेसाठी स्मार्टफोन किंवा कम्प्युटरवर इंटरनेट असणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या:

पोस्टात खाते असल्यास तातडीने हे काम करा! अन्यथा मोठं नुकसान

नियम बदलले! ‘या’ दोन बँकांच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी आता OTP ची गरज

मोठी बातमी! HDFC बँकेला नवीन क्रेडिट कार्ड जारी करता येणार नाही, RBIचे निर्बंध

(RTGS to be available 24x7x365 from Dec 2020)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.