RBI Repo Rate: मध्यमवर्ग महागाईत होरपळणार, रेपो दर वाढीचा काय परिणाम? अच्छे दिन कधी येणार?

Loan Interest Rate EMI: चार वर्षानंतर केंद्रीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात बदल केला. रेपो दरात 0.25 टक्क्यांची वाढ करण्यात आली. अगोदरचा महागाईचा सामना करणाऱ्या कर्जदारांचा EMI आता वाढणार आहे. मध्यमवर्ग महागाईत होरपळून निघण्याची शक्यता आहे.

RBI Repo Rate: मध्यमवर्ग महागाईत होरपळणार, रेपो दर वाढीचा काय परिणाम? अच्छे दिन कधी येणार?
अच्छे दिन विसरा, रेपो दरात वाढ
| Updated on: Oct 07, 2026 | 11:55 AM

RBI Repo Rate: जागतिक अस्थिरता, जगावर लादलेली दोन मोठी युद्ध आणि इंधन पुरवठ्यावरील मोठा परिणाम यामुळे जगभरात महागाईचा भडका उडाला आहे. भारतही त्यापासून अलिप्त राहू शकत नाही. देशाला इंधन दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. मध्यंतरी इंधन आणि गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याचे परिणामही देशाने भोगले. पण महागाईचा भाता बंद करण्यात केंद्र सरकारला यश येताना दिसत नसल्याचे चित्र आहे. GDP वाढ होत असली तरी महागाई काही केल्या आटोक्यात येत नसल्याने मध्यमवर्गीय होरपळून निघाला आहे. आता त्यात वाढीव EMI ची भर पडली आहे. केंद्रीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.25 टक्क्यांची वाढ करण्यात आली. अगोदरचा महागाईचा सामना करणाऱ्या कर्जदारांचा EMI आता वाढणार आहे. पण हा केवळ इतका मर्यादीत परिणाम नाही.

चार वर्षानंतर रेपो दरात वाढ

Loading...

जवळपास चार वर्षांपर्यंत 44 महिने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात वाढ केलेली नव्हती. पण जागतिक परिमाण बदलेले आहे. त्याचे चटके सगळ्याच अर्थव्यवस्थांना बसत आहे. देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. महागाईला वेसण घालण्यासाठी केंद्रीय बँकेने रेपो दरात 0.25 टक्क्यांची वाढ केली. यामुळे आता रेपो दर 5.5 टक्के इतका झाला. व्याजदरातील हा बदल अर्थातच मध्यमवर्गासाठी आर्थिक फटका देणारा ठरणार आहे.

व्याजदर वाढल्याने मध्यमवर्गीयाच्या हप्त्यात (EMI) मध्ये वाढ होईल. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केले आहे की महागाईला आळा घालण्यासाठी आता टप्प्याटप्प्याने कडक धोरण राबवावे लागेल. यामुळे यापुढे सुद्धा व्याजदर वाढण्याचेच संकेत त्यांनी दिले. त्यामागे एक मुख्य कारण आहे. महागाई वाढण्याची भीती कायम आहे.

महागाई डायन…

आरबीआयने आज एक मोठा अंदाज वर्तवला, त्यानुसार, ऑगस्ट महिन्यापासून महागाईने डोके वर काढले आहे. महागाई दर 4.8% इतका होता. या वर्षात महागाई दर 5.2 टक्के राहील. तर दुसऱ्या तिमाहीत हा दर 4.9 टक्के तर तिसऱ्या तिमाहीत महागाई दर 6 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. चौथ्या तिमाहीत महागाई दर 5.7 टक्के राहू शकतो, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

अच्छे दिन आता विसराच

वाढत्या महागाईमुळे व्याजदर वाढले आहेत. व्याजदरात वाढ करून केंद्रीय बँक मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन टिकवण्याची कसरत करत आहे. मागणीला लगाम कसण्याचा हा प्रयत्न आहे. कर्जे महाग झाले की सर्व प्रकारची मागणी कमी होते. नवीन सामान खरेदी असो वा कंपन्यांमधील गुंतवणूक असो, यामध्ये घसरण होते. सध्या भारताचा विकास दर (GDP) 7.8 टक्के इतका आहे. व्याजदर वाढले तर महागाई नियंत्रणात येईल. पण यामुळे उत्पन्नही वाढणार नाही. यामुळेच बाजारातील तज्ज्ञ, अर्थशास्त्री सामान्य आणि मध्यमवर्गाने आता अच्छे दिन नसतील असा इशारा दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us