AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI Repo Rate: मोठी बातमी, सगळीकडूनच महागाईच मार! तुमच्या कर्जाचा हप्ता वाढणार, 44 महिन्यानंतर व्याजदरात वाढ, रेपो दरात आरबीआयने केली वाढ

RBI Repo Rate: सर्वसामान्य माणूस आता महागाईत चांगला भरडला जाणार आहे. केंद्रीय रिझर्व्ह बँकेने जवळपास 44 महिन्यानंतर रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पतधोरण समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. यामुळे सर्व प्रकारच्या कर्जावरील ईएमआय वाढणार आहे. रेपो दरात यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये वाढ करण्यात आली होती.

RBI Repo Rate: मोठी बातमी, सगळीकडूनच महागाईच मार! तुमच्या कर्जाचा हप्ता वाढणार, 44 महिन्यानंतर व्याजदरात वाढ, रेपो दरात आरबीआयने केली वाढ
रेपो दरात वाढ
| Updated on: Oct 07, 2026 | 10:41 AM
Share

RBI Repo Rate: जवळपास 4 वर्षानंतर देशाच्या केंद्रीय बँकेने महागाईविरोधात मोर्चा उघडला आहे. RBI ने पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दरात वाढ झाली होती. आरबीआयचे गव्हर्नरने रेपो दरात 25 बेसिस पॉईंटसची वाढ करण्याची घोषणा केली. यामुळे आता देसात वाहन कर्ज आणि गृहकर्ज आणि इतर कर्ज महाग होण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य कर्जदारांवर मोठा भार पडेल. आता कर्जाचा हप्ता (EMI) वाढेल. महागाईचा कहर असतानाच आरबीआयच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे.

सलग चार वर्षे EMI स्थिर

यापूर्वी आरबीआयने सलग चार वेळा कोणताही बदल केला नाही. तर वर्ष 2025 मध्ये फेब्रुवारी ते डिसेंबरपर्यंत रेपो दरात 125 पॉईंटसची कमी आली. यावर्षी मध्य पूर्वेत मोठे युद्ध सुरू आहे. तर कच्चा तेलाच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. तर त्याचा परिणाम मालवाहतूकीवरही झाला आहे. यामुळे देशात अनेक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. महागाई आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय बँकेने रेपो दरात वाढ केली आहे.

रेपो दरात किती वाढ?

RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या घोषणेनुसार, पतधोरण समितीने व्याज दरात वाढीचा निर्णय घेतला. रेपो दरात 25 बेसिस पॉईंटची वाढ झाली आहे. आता आरबीआयचा रेपो दर 5.25 टक्क्यांनी वाढून 5.50 टक्के इतका होईल. यापूर्वी फेब्रुवारी 2025 पासून ते डिसेंबर 2025 या दरम्यान आरबीआयने रेपो दरात 125 बेसिस पॉईंटची कपात केली होती. त्यानंतर आरबीआयने रेपो दरात कोणतीच वाढ केली नव्हती. रेपो दर स्थिर होता.

आज पतधोरण समितीची बैठक झाली. त्यावेळी आरबीआय गव्हर्नरने मध्य-पूर्वेतील युद्ध आणि इंधन संकटावरून इशारा दिला. त्यांनी महागाई वाढण्याचे संकेतही दिले. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात अमेरिकेच्या फेड रिझर्व्हने सुद्धा व्याज दरात वाढ केली होती. त्यामुळेच अनेक परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसा काढून घेत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

महागाई भडकणार?

RBI च्या पतधोरण समितीने महागाईवर मोठी चिंता व्यक्त केली. आरबीआयनुसार, ऑगस्ट महिन्यात CPI महागाई दर वाढून 4.8% झाला. तर जुलै महिन्यात हा दर 4.5% टक्के होता. सध्या महागाईने बाजारावर सत्ता चालवली आहे. अन्नपदार्थ महागले आहेत. इंधनाचे दरही वाढले आहेत. कच्चा तेलाचा पुरवठा प्रभावित झाल्याचा हा परिणाम आहे. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, या वर्षात महागाईच दर 5.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे. दुसर्‍या तिमाहीत देशात महागाईचा दर 4.9 टक्के तर तिसऱ्या तिमाहीत हा दर 6 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाजही वर्तवला आहे. चौथ्या तिमाहीत महागाई दर 5.7 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

Follow Us
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...