RBI EMI : अरे काही लिमिट आहे की नाही, अजून किती वाढवाल ईएमआय?

RBI EMI : आता तुम्ही म्हणाल कोणतं नवीन संकट अंगावर आलं आहे. तर संकट कदाचित येऊ शकतं. आज रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीचा निर्णय होणार आहे. त्यानंतर आपला किती खिसा कापल्या जाणार, या बातम्या तुमच्या स्क्रीनवर आदळतीलच..

RBI EMI : अरे काही लिमिट आहे की नाही, अजून किती वाढवाल ईएमआय?
पडणार का बॉम्ब
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 9:24 AM

नवी दिल्ली : महागाईने (Inflation) गेल्या दोन वर्षांपासून सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. काही दिवसांपूर्वी 20 ते 25 रुपये असणारे दूध (Milk Price Hike) आज 60 ते 70 रुपयांच्या घरात मिळत आहे. पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol Diesel Price) कमी होतील हे तर दिवा स्वप्नच आहे. भाजीपाला, अन्नधान्य, दाळी यांच्या किंमतींनी सर्वसामान्य माणसाला नागडं करायचं तेवढं ठेवलं आहे. त्यातच महागाई आटोक्यात आणण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) कडक पाऊलं उचलली आहेत. त्याचा फटका जनतेलाच बसत आहे. मध्यमवर्गाला या महागाईने होरपळून काढले आहे. प्रत्येक गोष्टीत हात आखडता घ्यावा लागत असल्याने त्यांची घुसमट होत आहे. आज आरबीआयच्या पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीचा तिसरा दिवस आहे. आज रेपो दरात किती वाढ होणार आणि त्यामुळे ईएमआय किती वाढणार हे लवकरच कळेल. आता महागाई ही तुमच्या कुटुंबाचाच एक सदस्य असल्याचे समजून घ्या.

आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक 6 फेब्रवारी रोजी सुरु झाली. ही बैठक 10 फेब्रुवारीपर्यंत असेल. बुधवारी बैठकीचा तिसरा दिवस आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) आज पतधोरण समितीच्या बैठकीतील निर्णयाची थोड्याच वेळात माहिती देतील.

ही बैठक अर्थसंकल्पानंतरची पहिली बैठक आहे. तसेच चालु आर्थिक वर्षातील ही शेवटची बैठक आहे. या बैठकीत आता आरबीआय व्याज दरात म्हणजे रेपो दरात (RBI Repo Rate) वाढ करते की त्यात कोणताही बदल करणार नाही, हे थोड्याच वेळात समोर येईल.

हे सुद्धा वाचा

गेल्या काही दिवसांपासून किरकोळ महागाईचा दर घसरला आहे. त्यामुळे रेपो दरात वाढ होणार नाही, असा काही तज्ज्ञांचा अंदाज आहे. तर रेपो दरात 25 बेसिस पॉईंटची वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता काही वेळातच यावरील पडदा उठणार आहे. सर्वसामान्यांच्या माथी पुन्हा दरवाढीचा धोंडा पडणार का? हे कळेलच.

S&P ग्लोबल रेटिंग्सनुसार, भारताच्या महागाई दरात सातत्याने घसरण होत आहे. सध्या रेपो दर 6.25 टक्के आहे. हा दर उच्चांकी आहे. त्यात अजून वाढ झाल्यास सर्वसामान्यांच्या खिशावर पुन्हा ईएमआय वाढीचा भार पडेल. त्यामुळे रेपो दरात पुन्हा वाढीची शक्यता कमी आहे.

S&P च्या अहवालानुसार, भारतात महागाईने दीर्घकाळ मुक्काम ठोकला. पण 2022 मध्ये दुसऱ्या सहामाहीत महागाईला पहिला धक्का बसला. महागाई दर त्यानंतर सातत्याने कमी होत आहे. अहवालानुसार, महागाई कमी होत असल्याने आरबीआयने रेपो दरात वाढीचा विचार यावेळी टाळणे सर्वांच्याच हिताचे ठरेल. गरजच असेल तर तो अत्यंत कमी ठेवावा.

तज्ज्ञांच्या दाव्यानुसार आरबीआय बुधवारी रेपो दर 6.50 करु शकतो. त्यात 25 बीपीएसची किंचित वाढ अपेक्षित आहे. महागाईचा दबाव कमी झाल्याने रेपो दरात मोठी वाढ होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. किरकोळ महागाई सध्या निश्चित केलेल्या सहनशील पातळीपेक्षा सहाजिकच कमी आहे. त्यामुळे रेपो दरात मोठ्या वाढीची गरज नाही.

आरबीआयने मे 2022 पासून ते आतापर्यंत रेपो दरात 190 बेसिस प्वॉईंट्सची वृद्धी केली आहे. डिसेंबरपर्यंत रेपो दर 5.90% होता. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय रेपो दरात वाढ केली. रेपो दर 6.25 टक्क्यांवर पोहचला होता.

सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर 7.41% होता. महागाई दर घसरला. ऑक्टोबर महिन्यात महागाई दराने मागील तीनही महिन्यांचे रेकॉर्ड बदलले. ऑक्टोबर महिन्यात महागाई दर घसरून 6.77% वर आला. खाद्यान्न आणि अन्नधान्यांच्या किंमती झाल्याचा हा परिणाम होता.

7 डिसेंबर रोजी रेपो दरात 35 बीपीएसने वाढ करण्यात आली होती. तर आता या फेब्रुवारी महिन्यात पुन्हा हा दर 25 बीपीएसने वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे रेपो दर 6.50% पर्यंत वाढू शकतो.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.