
RBI Repo Rate : गृहकर्ज, आलिशान कार खरेदीचा विचार करत असाल तर ही आनंदवार्ता तुमच्यासाठीच आहे. या आर्थिक वर्षात कर्जदारांच्या खिशावरील ताण कमी झाला आहे. आता अजून एक आनंदवार्ता येऊन धडकली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची पतधोरण समिती येत्या ऑगस्ट महिन्यात रेपो दरात अजून 25 बेसिस पाईंटने कपात करेल, असे आयसीआयसीआय बँकेच्या अहवालात दावा आहे. त्यामुळे येत्या काळात रेपो दर 5.25 टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. हा कर्जदारांना मोठा दिलासा असेल.
इकॉनॉमिक्स टाईम्सने आयसीआयसीआयच्या अहवालाआधारे हे वृत्त दिले आहे. यामध्ये शहरी भागातील वस्तूंची मागणी घटल्याचे तर ग्रामीण भागातील वस्तूंची मागणी अधिक मजबूत झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे भारताची आर्थिक घोडदौड ही संमिश्र असण्याचा दावा करण्यात आला आहे. सध्याचा महागाईचा आलेख बघता ऑगस्ट महिन्यात रेपो दरात अजून कपातीचा दावा अहवालात करण्यात आला आहे. फेब्रुवारी आणि एप्रिल 2025 महिन्यात रेपो दरात 0.25-0.25 टक्के कपात करण्यात आली होती. त्यामुळे रेपो दर 6.50 वरून 6 टक्क्यांवर आला होता. आता त्यात 0.50 टक्क्यांची कपात झाल्याने रेपो दर 5.5 टक्क्यांवर आला आहे.
रेपो दर 5.25 टक्क्यांवर
सध्या महागाईच्या वारूला वेसण घालण्यात सरकारला यश आल्याचे मानण्यात येत आहे. महागाईचा निर्देशांक घसरल्याने ऑगस्ट महिन्यात त्याचे परिणाम दिसून येतील. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक पुढील महिन्यात आहे. या बैठकीत रेपो दरात 25 बेसिस पाईंटची कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेपो दर थेट 5.25 टक्क्यांवर येईल असा दावा ICICI च्या अहवालात करण्यात आला आहे.
दर कपातीचे मिशन सुरूच
आरबीआयने 2025 पासून सुरू केलेल्या रेपो दर कपातीचे मिशन सुरूच आहे. यापूर्वी फेब्रुवारी आणि एप्रिल 2025 महिन्यात रेपो दरात 0.25-0.25 टक्के कपात करण्यात आली होती. त्यामुळे रेपो दर 6.50 वरून 6 टक्क्यांवर आला होता. आता त्यात 0.50 टक्क्यांची कपात झाल्याने रेपो दर 5.5 टक्क्यांवर आला आहे. आता त्यात अजून कपातीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.