RBI Repo Rate: मोठी बातमी, सगळीकडूनच महागाईच मार! तुमच्या कर्जाचा हप्ता वाढणार, 44 महिन्यानंतर व्याजदरात वाढ, रेपो दरात आरबीआयने केली वाढ
RBI Repo Rate: सर्वसामान्य माणूस आता महागाईत चांगला भरडला जाणार आहे. केंद्रीय रिझर्व्ह बँकेने जवळपास 44 महिन्यानंतर रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पतधोरण समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. यामुळे सर्व प्रकारच्या कर्जावरील ईएमआय वाढणार आहे. रेपो दरात यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये वाढ करण्यात आली होती.

RBI Repo Rate: जवळपास 4 वर्षानंतर देशाच्या केंद्रीय बँकेने महागाईविरोधात मोर्चा उघडला आहे. RBI ने पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दरात वाढ झाली होती. आरबीआयचे गव्हर्नरने रेपो दरात 25 बेसिस पॉईंटसची वाढ करण्याची घोषणा केली. यामुळे आता देसात वाहन कर्ज आणि गृहकर्ज आणि इतर कर्ज महाग होण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य कर्जदारांवर मोठा भार पडेल. आता कर्जाचा हप्ता (EMI) वाढेल. महागाईचा कहर असतानाच आरबीआयच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे.
सलग चार वर्षे EMI स्थिर
यापूर्वी आरबीआयने सलग चार वेळा कोणताही बदल केला नाही. तर वर्ष 2025 मध्ये फेब्रुवारी ते डिसेंबरपर्यंत रेपो दरात 125 पॉईंटसची कमी आली. यावर्षी मध्य पूर्वेत मोठे युद्ध सुरू आहे. तर कच्चा तेलाच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. तर त्याचा परिणाम मालवाहतूकीवरही झाला आहे. यामुळे देशात अनेक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. महागाई आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय बँकेने रेपो दरात वाढ केली आहे.
रेपो दरात किती वाढ?
RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या घोषणेनुसार, पतधोरण समितीने व्याज दरात वाढीचा निर्णय घेतला. रेपो दरात 25 बेसिस पॉईंटची वाढ झाली आहे. आता आरबीआयचा रेपो दर 5.25 टक्क्यांनी वाढून 5.50 टक्के इतका होईल. यापूर्वी फेब्रुवारी 2025 पासून ते डिसेंबर 2025 या दरम्यान आरबीआयने रेपो दरात 125 बेसिस पॉईंटची कपात केली होती. त्यानंतर आरबीआयने रेपो दरात कोणतीच वाढ केली नव्हती. रेपो दर स्थिर होता.
आज पतधोरण समितीची बैठक झाली. त्यावेळी आरबीआय गव्हर्नरने मध्य-पूर्वेतील युद्ध आणि इंधन संकटावरून इशारा दिला. त्यांनी महागाई वाढण्याचे संकेतही दिले. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात अमेरिकेच्या फेड रिझर्व्हने सुद्धा व्याज दरात वाढ केली होती. त्यामुळेच अनेक परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसा काढून घेत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
#WATCH | Delivering Monetary Policy Statement, RBI Governor Sanjay Malhotra says, “The MPC noted that the global context, on account of geopolitical developments, remains challenging. Nonetheless, the Indian economy has been strong and the economic momentum remains broad-based. Moreover, the economy is expected to remain resilient. It is further observed, in light of the available data, that it is clear that inflation and its outlook are not benign as they were last year. With headline CPI inflation expected to average almost 5.8 % in the next three quarters, including this, and core inflation projected at 4.4% for this financial year.”
— ANI (@ANI) October 7, 2026
महागाई भडकणार?
RBI च्या पतधोरण समितीने महागाईवर मोठी चिंता व्यक्त केली. आरबीआयनुसार, ऑगस्ट महिन्यात CPI महागाई दर वाढून 4.8% झाला. तर जुलै महिन्यात हा दर 4.5% टक्के होता. सध्या महागाईने बाजारावर सत्ता चालवली आहे. अन्नपदार्थ महागले आहेत. इंधनाचे दरही वाढले आहेत. कच्चा तेलाचा पुरवठा प्रभावित झाल्याचा हा परिणाम आहे. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, या वर्षात महागाईच दर 5.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे. दुसर्या तिमाहीत देशात महागाईचा दर 4.9 टक्के तर तिसऱ्या तिमाहीत हा दर 6 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाजही वर्तवला आहे. चौथ्या तिमाहीत महागाई दर 5.7 टक्के राहण्याचा अंदाज आहे.