Home Loan EMI: आरबीआयचे मोठे गिफ्ट! 50 लाख कर्जावर आता द्यावा लागेल ईएमआय?

Home Loan EMI: RBI ने रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. या वर्षात आरबीआयने आतापर्यंत 1.25 टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे गृहकर्जदारांचा हप्ता, ईएमआय किती कमी होईल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 25 आणि 50 लाख रुपयांवर आता काय असेल ईएमआय?

Home Loan EMI: आरबीआयचे मोठे गिफ्ट! 50 लाख कर्जावर आता द्यावा लागेल ईएमआय?
किती कमी होईल EMI?
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Dec 05, 2025 | 1:11 PM

RBI Repo Rate: आरबीआयने कर्जदारांना आणि घर, वाहन खरेदीदारांना मोठा दिलासा दिला. ईएमआयमध्ये आता मोठी कपात होणार आहे. जवळपास 6 महिन्यानंतर आरबीआयने ईएमआयमध्ये दिलासा दिला आहे. केंद्रीय बँकेने रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात झाली आहे. या कॅलेंडर वर्षात आरबीआयने 1.25 टक्क्यांची व्याज दरात कपात झाली आहे. जर एखाद्याने 8.50 टक्के व्याज दराने 50 लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल तर प्रत्येक महिन्याला 43,391 रुपायंचा ईएमआय येईल. आता नवीन व्याजदरानंतर ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 788 रुपयांची बचत होईल.

25 लाखांच्या गृहकर्जावर किती दिलासा?

जर यापूर्वी 8.5 टक्के व्याज दराने 20 वर्षांसाठी 25 लाखांचे कर्ज एखाद्या व्यक्तीने घेतले असेल. तर त्या व्यक्तीला गृहकर्जासाठी 21,696 रुपयांचा हप्ता द्यावा लागेल. आरबीआयने रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. नवीन रेपो दरानुसार व्याज दर 8.25 टक्के असू शकतो. त्यामुळे ईएमआयमध्ये कपात होऊन ईएमआय 21,302 रुपये होईल. म्हणजे गृहकर्जावरील व्याजदरात दरमहा 394 रुपयांची बचत होईल.

50 लाखांचे कर्ज घेणाऱ्यांवर किती परिणाम

जर एखाद्या व्यक्तीने 8.5 टक्के व्याजदराने 20 वर्षांसाठी 50 लाखांचे कर्ज घेतले असेल तर त्या व्यक्तीला दरमहा 43,391 रुपयांचा ईएमआय द्यावा लागेल. आरबीआयने रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुले गृहकर्जावरील अंदाजित व्याजदर 8.25 टक्के कमी होईल. यामुळे गृहकर्जावरील ईएमआय घसरून 42,603 रुपये होऊ शकते. अशा कर्जदाराचे दरमहा
788 रुपये वाचतील.

यावर्षात 1.25 टक्क्यांची कपात

यावर्षभरात आरबीआयने रेपो दरात आतापर्यंत एकूण 1.25 टक्क्यांची कपात केली आहे. केंद्रीय बँकेने यावर्षी फेब्रुवारी ते जून महिन्यापर्यंत एकूण एक टक्का रेपो दर घटवला होता. तर ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात कोणताही बदल झाला नाही. रेपो दर जैसे थे ठेवण्यात आला. रेपो दर कालपर्यंत 5.5 टक्क्यांवर होता. त्यात आता 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो दर हा 5.25 टक्क्यांवर आला आहे. पतधोरण समितीच्या पुढील बैठकीत अजून त्यात कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात गृहकर्ज आणि वाहन कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तर या दोन्ही उद्योगांना या नवीन निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.