AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Repo Rate : रेपो दर वाढीचा परिणाम, विकासाचा दर मंदावणार; क्रेडिट एजन्सीचा अहवाल

महागाई आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.40 अंकांनी वाढ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. रिझर्व्ह बँकेच्या नियमित समीक्षेच्या व्यतिरिक्त मध्यावधी धोरण समीक्षा रिझर्व्ह बँकेद्वारे करण्यात आली होती.

Repo Rate : रेपो दर वाढीचा परिणाम, विकासाचा दर मंदावणार; क्रेडिट एजन्सीचा अहवाल
Image Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: May 05, 2022 | 11:21 PM
Share

नवी दिल्ली– रिझर्व्ह बँकेच्या (Reserve bank of india) रेपो दरात वाढ करण्याच्या निर्णयाचे संमिश्र पडसाद अर्थजगतात उमटत आहेत. रेपो दरात वाढीमुळे बँकिंग यंत्रणेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कर्ज वितरणाचा वेग मंदावण्याची भीती आघाडीची रेटिंग एजन्सी इंडिया रेटिंगने (India rating) वर्तविली आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.40 अंकांनी वाढ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. रिझर्व्ह बँकेच्या नियमित समीक्षेच्या व्यतिरिक्त मध्यावधी धोरण समीक्षा रिझर्व्ह बँकेद्वारे करण्यात आली होती. इंडिया रेटिंग्सने विस्तृत अहवाल प्रकाशित केला आहे. उद्योग आणि सेवा क्षेत्राच्या वाढीच्या विकासावर कर्ज दर (Loan Distribution rate) वितरणावर थेट परिणाम होऊ शकतो. रेपो दरात वाढ केल्यानंतर देशातील सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील बँकांनी कर्ज दरात वाढ करण्याचा देखील निर्णय घेतला आहे.

रेपो दर किती?

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. रेपो दरात 0.4 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. नव्या बदलासह रेपो दर 4.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. रेपो दर वाढीमुळे अन्य बँकांच्या कर्जदरात वाढ होणे निश्चित मानले जात आहे.

रेपो रेटचं कनेक्शन:

रिझर्व्ह बँकेद्वारे अखत्यारीतील बँकांना भाग भांडवलाचा पुरवठा केला जातो. त्या दरास रेपो दर म्हटले जाते. रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराचा परिणाम अन्य बँकांच्या दरावर थेट जाणवतो. रिझर्व्ह बँकेने रेपो दर जैसे थे ठेवले आहे. त्यामुळे बँकांच्या दरात कोणतीही वाढ नोंदविली गेली नव्हती. रेपो दरात वाढ केल्यास बँकांना आपल्या ग्राहकांना देण्यात येणाऱ्या दरात वाढ करणे आवश्यक ठरते. रेपो दरात वाढ झाल्यास लेडिंग रेटमध्ये निश्चितपणे वाढ होते. त्यामुळे आगामी काळातील रिझर्व्ह बँकांच्या धोरणांनंतर देशाची बँकांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

कोरोनाचा अर्थव्यवस्थेचा दोन वर्षात मोठा फटका

गेल्या दोन वर्षात कोरोनाने जगाला खूप मोठा फटका बसला आहे. त्याचा सहाजिकच परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही मोठा झाला आहे. भारतीय अर्थव्यवस्था आता कोरोनाचा जोर कमी झाल्यावर पुन्हा नव्या जोमाने उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी रिझर्व बँकेकडून काही नवे धोरणात्मक निर्णय घेण्यात येत आहेत. कोरोनाचा सर्वात जास्त फटका हा भारतातील उद्योग क्षेत्राला बसला आहे. उद्योग क्षेत्राचं दोन वर्षात मोठं नुकसान झालं आहे. ते भरून काढण्याचा प्रयत्न आता चारी बाजुंनी केला जात आहे.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर