Digital Currency : आता तुमच्याकडेही लवकरच डिजिटल रुपया, या चार बँकांना मिळाली परवानगी..

| Updated on: Nov 15, 2022 | 3:50 PM

Digital Currency : Digital Rupee लवकरच तुम्हाला ही वापरता येणार आहे..

Digital Currency : आता तुमच्याकडेही लवकरच डिजिटल रुपया, या चार बँकांना मिळाली परवानगी..
आता तुमच्याकडेही डिजिटल रुपया
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचा (Reserve Bank of India-RBI) डिजिटल चलनाचा पायलट प्रकल्पाने गती घेतली आहे. सध्या त्याचा वापरा आरबीआय आणि देशातील मोठ्या बँकांमधील (Nationalized Bank) मोठ्या व्यवहारात करण्यात येत आहे. पण सर्वसामान्य नागरिकांसाठी हे डिजिटल चलन (Digital Currency) कधी मिळणार असा प्रश्न विचारण्यात येत होता. तर आता लवकरच हा डिजिटल रुपया (Digital Rupee) तुमच्याकडेही असणार आहे..

डिजिटल चलन मध्यवर्ती बँकेने (CBDC) आता हे डिजिटल चलन सर्वसामान्यांच्या हातात देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी CBDC ने पथदर्शी कार्यक्रम (Pilot Program) तयार केला आहे. हा कार्यक्रम नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी चार बँकांवर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.

इकोनॉमिक टाईम्सने याविषयीचा एक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार सर्वसमान्यांपर्यंत हे चलन पोहचविण्यासाठी आरबीआयने एक यादी तयार केली आहे. या बँकांमध्ये HDFC Bank, ICICI Bank, State Bank of India, IDFC First Bank या चार बँकांची नावे यामध्ये समोर आली आहेत.

हे सुद्धा वाचा

डिजिटल चलन बाजारात आणल्यानंतर ते सध्या वापरात असलेल्या डिजिटल पेमेंट अॅप, पद्धतीसोबत जोडायचे अथवा नाही, याविषयीचा निर्णय ही लवकरच घेण्यात येणार आहे. परंतु, त्यापूर्वी त्याविषयीच्या नियमांची चौकट असणे आवश्यक असल्याने, त्यावर अगोदर विचार करण्यात येणार आहे.

नागरिकांपर्यंत डिजिटल चलन पोहचविण्यासाठी सीबीडीसी पायलट प्रकल्प तयार करत आहे. त्यासाठी पाच बँकांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यापैकी वरील चार बँकांची नावे समोर आली आहेत.

ही सेवा सुरु करण्यासाठी आरबीआय आणि राष्ट्रीय देयके महामंडळाची (National Payment Corporation of India-NPCI) भूमिका महत्वाची असेल. काही ग्राहका आणि व्यापाऱ्यांना या डिजिटल रुपयाच्या पथदर्शी प्रकल्पात सहभागी करुन घेतल्यानंतर पुढे सर्वांसाठी हे डिजिटल चलन खुले करण्यात येणार आहे.

या चार बँकांमधील एचडीएफसी बँकेकडे 680 लाखांहून अधिक ग्राहक आहेत. ही खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. त्यानंतर खासगी क्षेत्रातील दुसरी मोठी बँक आयसीआयसीआय बँक आहे. या बँकेचे 240 लाखांहून अधिक ग्राहक आहेत.

तर भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ही या पथदर्शी प्रकल्पात सहभागी असेल. या सरकारी बँकेकडे आजच्या घडीला 45 कोटींहून अधिकचे ग्राहक आहेत. तर आणखी एक बँक आयडीएफसी फर्स्ट बँकेकडे सध्या 73 लाख ग्राहक आहेत.