KYC Rules : बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! KYC संदर्भात आरबीआय गव्हर्नर यांनी केली ही घोषणा..

KYC Rules : ई-केवायसी संदर्भात आरबीआय गव्हर्नर यांनी मोठा दिलासा दिला आहे..

KYC Rules : बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! KYC संदर्भात आरबीआय गव्हर्नर यांनी केली ही घोषणा..
केवायसीबाबत नियमात बदल
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Dec 08, 2022 | 9:12 PM

नवी दिल्ली : आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shakti Kant Das) यांनी ई-केवायसी (E-KYC) संदर्भात मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे ई-केवायसीसाठी ग्राहकांना वारंवार बँकेत (Bank) जाण्याची गरज राहणार नाही. जर ग्राहकाला दुसऱ्यांदा केवायसी करायची असेल तर त्यांना बँकेत जाण्याची गरज राहणार नाही. दास यांच्या दाव्यानुसार, जर तुमचा पत्ता (Address Change) बदलला, तर ही माहिती तुम्ही ई-मेल अथवा मोबाईल क्रमांकावरुन बँकेला त्याची माहिती द्या. त्यासाठी पुन्हा पुन्हा बँकेत जाण्याची गरज नसल्याचे दास यांनी स्पष्ट केले आहे.

RBI ने हे स्पष्ट केले आहे की, जर तुम्ही बँकेत यापूर्वीच केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली असेल तर तुम्हाला हीच प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला केवळ CKYCR Identify क्रमांक बँकेसोबत शेअर करावा लागेल. पण दुसऱ्यांदा केवायसीसाठी बँक तुम्हाला आग्रह करत असेल तर त्याची तक्रार करता येते.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, Re-KYC साठी ग्राहकांना बँकेत फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन री-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करु शकता.

जर तुमच्या केवायसी तपशीलात काहीच बदल करण्यात आला नसेल अथवा झाला नसेल तर बँकेत जाण्याची गरज नाही. तुम्ही ई-मेल पाठवून अथवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन बँकेला मॅसेज करता येतो. त्यामुळे री-केवायसीसाठी बँकेत जाण्याची गरज नाही.

तुम्ही घरबसल्या ई-मेल अथवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन बँकेला मॅसेज करु शकता. बँक पुढील 60 दिवसांत तुमचे सत्यापन पूर्ण करुन प्रक्रिया पूर्ण करेल. CKYCR Identify क्रमांकावरुन ही प्रक्रिया सोप्पी होईल. तरीही बँक केवायसीसाठी शाखेत येण्यासाठी आग्रही असेल तर लोकपालकडे दाद मागता येते.