AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेअर बाजाराची विक्रमी भरारी; सेन्सेक्सने पहिल्यांदाच ओलांडला 85 हजार अंकाचा टप्पा

Sensex Cross 85000 Points : अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याज दरात 0.50 टक्क्यांची कपात केली आहे. तेव्हापासून भारतीय शेअर बाजारात तेजीचे वारू उधळले आहे. जवळपास तीन व्यापारी सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने 2 टक्क्यांहून अधिकचा टप्पा ओलांडला आहे.

शेअर बाजाराची विक्रमी भरारी; सेन्सेक्सने पहिल्यांदाच ओलांडला 85 हजार अंकाचा टप्पा
शेअर बाजाराची विक्रमी भरारी
| Updated on: Sep 24, 2024 | 11:36 AM
Share

शेअर बाजाराने पुन्हा एकदा नवीन विक्रम नावावर केला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीने मैलाचा दगड गाडला आहे. सेन्सेक्स पहिल्यांदाच 85 हजार अंकांचा टप्पा ओलांडला आहे. सोमवारी लांब उडी नंतर सेन्सेक्स थोडा चाचपडला. तर निफ्टी 26 हजार अंकांचा टप्पा गाठण्यासाठी कसरत करत आहे. अमेरिकन केंद्रीय बँकेने व्याज दरात 0.50 टक्क्यांची कपात केल्याने शेअर बाजारात तुफान तेजी दिसून आली. जवळपास तीन व्यापारी सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने 2 टक्क्यांहून अधिकची उडी मारली आहे. येत्या काही दिवसात हे दोन्ही निर्देशांक तेजीत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टीचा नवीन रेकॉर्ड

शेअर बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टीवर दबाव दिसला. पण अगदी थोड्याच कालावधीत बाजाराची तुफान घौडदौड सुरू झाली. दोन्ही निर्देशाकांची धावाधाव दिसली. दोन्ही निर्देशांक विक्रमी पातळीवर पोहचले. सेन्सेक्स व्यापारी सत्रात 100 हून अधिक अंकांच्या तेजीसह 85,052.42 अंकावर पोहचला. त्याने सर्वकालीन उच्चांक गाठला. सकाळी 10 वाजून 25 मिनिटांनी सेन्सेक्स 90 अंकंच्या तेजीसह 85,016.35 अंकांवर होता. तर सेन्सेक्स 100 हून अधिक अंकांच्या घसरणीसह 84,860.73 अंकांवर उघडला.घौडदौडीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सध्या पडझडीचे सत्र सुरू झाले आहे.

कोणत्या शेअरमध्ये दिसली तेजी

नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये टाटा स्टीलच्या शेअरमध्ये सर्वात जास्त 3.50 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर हिंडाल्कोचा शेअर जवळपास 3 टक्क्यांच्या तेजीसह व्यापार करत आहे. जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअरमध्ये 2 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली आहे. PowerGrid च्या शेअरमध्ये 1.66 टक्के आणि HDFC Bank चा शेअर 0.79 टक्क्यांनी वधारला होता. बीएसईवर महिंद्रा अँड महिंद्रा, भारती एअरटेल, सनफार्माच्या शेअरमध्ये तेजीचे सत्र दिसून आले.

दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरील काही शेअरमध्ये घसरणीचे सत्र दिसले. HUL च्या शेअरमध्ये जवळपास दीड टक्के घसरण दिसली. तर LTEM, HDFC Life, Bajaj Finance आणि SBI Life च्या शेअरमध्ये जवळपास 1 टक्क्यांहून अधिकची घसरण दिसली. आज दुपारपर्यंत आणि नंतरच्या सत्रात बाजार आता कोणते वळण घेतो याकडे गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांचे लक्ष आहे.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.