AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! मुकेश अंबानींकडून नव्या कंपनीची घोषणा, भारतात नव्या क्रांतीचे वारे!

रिलायन्स इंडस्ट्रिज हा देशातील सर्वात मोट्या उद्योग समूहांपैकी एक आहे. या उद्योग समूहाने आतापर्यंत अनेक क्षेत्रांत आपला विस्तार केलेला आहे. विशेष म्हणजे हा विस्तार करून रिलायन्स उद्योग समूहाने भरपूर नफा कमवला आहे. दरम्यान, आता मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. या उद्योग समूहाने एका नव्या उपकंपनीची घोषणा केली आहे.

सर्वात मोठी बातमी! मुकेश अंबानींकडून नव्या कंपनीची घोषणा, भारतात नव्या क्रांतीचे वारे!
mukesh ambani
| Updated on: Aug 29, 2025 | 5:29 PM
Share

Reliance Intellengince : रिलायन्स इंडस्ट्रिज हा देशातील सर्वात मोट्या उद्योग समूहांपैकी एक आहे. या उद्योग समूहाने आतापर्यंत अनेक क्षेत्रांत आपला विस्तार केलेला आहे. विशेष म्हणजे हा विस्तार करून रिलायन्स उद्योग समूहाने भरपूर नफा कमवला आहे. दरम्यान, आता मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. या उद्योग समूहाने एका नव्या उपकंपनीची घोषणा केली आहे. या घोषनेंतर आता भारतात नवी क्रांती येणार, असे बोलले जात आहे.

मुकेश अंबानी यांनी काय घोषणा केली आहे?

रिलायन्स इंडस्ट्रिजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (एजीएम) नव्या कंपनीची घोषणा केली आहे. या कंपनीचे नाव रिलायन्स इंटेलिजन्स असे असेल. तसेच ही कंपनी पूर्णत: रिलायन्सच्या मालकीची असून ती एक अपकंपनी असेल, असे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. भारताला कृत्रिम बुद्धीमत्तेच्या क्षेत्रात वैश्विक पातळीवर नेतृत्व करता यावे असा उद्देश या कंपनीचा असल्याचे यावेळी मुकेश अंबानी यांनी सांगितले आहे.

घोषणा करताना मुकेश अंबानी नेमकं काय म्हणाले?

सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंटेलिजन्स या कंपनीची घोषणा करताना या कंपनीचे काम काय असेल याबाबतही सांगितले आहे. ही कंपनी प्रामुख्याने चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष ठेवणार आहे. या कंपनीच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर एआय डेटा सेंटर तयार केले जाईल. हे डेटा सेंटर अपारंपरिक उर्जेवर चालेल. या डेटा सेंटरची निर्मिती गुजरातमधील जामनगर येथे केली जात आहे.

कोणकोणत्या क्षेत्रात ही कंपनी काम करणार?

मुकेश अंबानी यांची ही नवी कंपनी जगभरातील प्रमुख टेक कंपन्या तसेच ओपन-सोअर्स कम्यूनिटीसोबत काम करेल. भारतातील सामान्य जनता, छोटे व्यावसायिक, मोठे उद्योजक यांना विश्वसनीय एआय सेवा उपलब्ध होतील. शिक्षण, कृषी आदी क्षेत्रातील समस्यांवर एआय आधारित उत्तर शोधण्यासाठी काम केले जाईल. त्यामुळे आता ही कंपनी भविष्यात नेमकी काय क्रांती करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा