
केंद्र सरकारने सहारा रिफंड पोर्टलवर गुंतवणूकदारांना पुन्हा अर्ज करण्याची संधी दिली आहे. वास्तविक ज्या लोकांनी आधीच क्लेम केला आह, परंतू कोणत्या चुकी वा कागदपत्राच्या कमतरतेमुळे रिफंड मिळालेला नाही. त्यांना आता कागदपत्रे पुन्हा जमा करण्याची संधी मिळाली आहे. आता क्लेमची रक्कम वाढवून १० लाख रुपये करण्यात आली आहे.आधी ही रक्कम ५० हजार रुपयांच्या पर्यंत होती. अधिकृत वेबसाईटच्या मते १९ नोव्हेंबर २०२५ च्या पासून १० लाख रुपयांपर्यंत रिफंडची सुविधा सुरु झालेली आहे.
आता सहारा इंडियात रक्कम गुंतवणारे गुंतवणूकदार १० लाख रुपयांपर्यंतचे क्लेमसाठी पुन्हा अर्ज करु शकणार आहेत. जर तुम्ही आधीच क्लेम केला आहे तर केवळ ४५ दिवसानंतर रि- क्लेम करु शकता. आधीचा क्लेम काही माहिती चुकीची किंवा अपुरी असल्याने फेटाळला असेल तर त्यास योग्य माहिती देऊन पुन्हा अर्ज करता येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. त्यासाठी तुम्हाला CRCS- सहारा रिफंड पोर्टलवर जावे लागणार आहे.
सरकारचे म्हणणे आहे की योग्य प्रकारे पुन्हा जमा केलेल्या दाव्यांना ४५ कामकाजाच्या दिवसात निपटारा केला जाणार आहे. याआधी अनेक गुंतवणूकदारांना ५०,००० रुपयांपर्यंत रक्कम पुन्हा मिळाली आहे. परंतू ज्यांच्या अर्जात काही त्रुटी आढळली होती. त्यांना आता सुधारणा करण्याची संधी दिली जाणार आहे.
अर्ज करताना लक्षात घ्यावे की सर्व माहिती पुन्हा भरावी. आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि बँक खाते तपशिल योग्य भरणे आवश्यक आहे. चुकीची माहिती दिल्यास क्लेम पुन्हा फेटाळला जाऊ शकतो. तसेच तुम्ही ५० हजार रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी क्लेम केला असेल तर ४५ दिवसानंतर स्टेट्स चेक करावे.
(https://mocresubmit.crcs.gov.in/resubmission/#/home) वर जावे. जर तुम्हाला रिसबमिशन प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी आल्या वा काही मदत हवी असेल तर पोर्टलच्या हेल्पडेस्कची मदत घेऊ शकता. यासाठी पोर्टल हेल्पलाईन क्रमांक ०११-२०९०९०४४ आणि ०११-२०९०९०४५ वर संपर्क करु शकता.
सरकारी अंदाजानुसार सहारा-SEBI खात्यात आता २६,००० कोटी रुपये जमा आहेत. ज्यात ५,००० कोटी रिफंडसाठी वेगळे ठेवले आहेत. केंद्र सरकारने साल २०२२ मध्ये सांगितले होते की सहारा इंडिया ग्रुपच्या कंपन्यात एकूण गुंतवणूकदारांची संख्या १३ कोटी आहे.आणि या गुंतवणूकदारांचे १.१२ लाख कोटी रुपये अडकले आहे.