Repo Rate: 20 वर्षांचा EMI अवघ्या 15 वर्षांत संपणार; घर-वाहन कर्ज स्वस्त,RBI कडून नवीन वर्षांचे गिफ्ट

RBI Repo Rate: काल आरबीआयने रेपो दरात 0.25 कपातीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर गृहकर्जदारांना त्याचा किती फायदा होईल याची विचारणा होत आहे. तर त्यांना या नवीन निर्णयामुळे मोठा फायदा होणार आहे. तर नवीन कर्जदारांनाही स्वस्तात गृहकर्ज, वाहन कर्ज मिळेल.

Repo Rate: 20 वर्षांचा EMI अवघ्या 15 वर्षांत संपणार; घर-वाहन कर्ज स्वस्त,RBI कडून नवीन वर्षांचे गिफ्ट
आरबीआय रेपो दर गृहकर्ज स्वस्त
| Updated on: Dec 06, 2025 | 11:49 AM

Home-Car Loan: येणाऱ्या काही दिवसात गृहकर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त होईल. सध्याचा EMI कमी होईल. RBI ने रेपो दरात 0.25 टक्क्यांच्या कपातीचा निर्णय घेतला आहे. पतधोरण समितीच्या बैठकीनंतर 5 डिसेंबर रोजी आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याविषयीची आनंदवार्ता दिली. रिझर्व्ह बँक ज्या व्याजदराने बँकांना कर्ज पुरवठा करते. त्याला रेपो दर असं म्हणतात. बँकांना जेव्हा स्वस्त कर्ज मिळते. त्यावरचा व्याजदर कमी होतो. तेव्हा ग्राहकांना त्याचा फायदा होतो. होम आणि ऑटो कर्ज o.25 टक्क्यांनी स्वस्त होईल.

तुमचे महिन्याचे इतके रुपये वाचतील

रेपो दरातील ताज्या कपातीनंतर 20 वर्षाच्या 20 लाख रुपयांच्या कर्जावरील EMI 310 रुपयांनी कमी होईल. 25 लाखांचे कर्ज एखाद्या व्यक्तीने घेतले असेल तर 394 रुपयांची बचत होईल. 30 लाखांचे कर्ज असेल तर ईएमआयवर 465 रुपयांची बचत होईल. 20 वर्षांसाठी 50 लाखांचे कर्ज घेतले असेल तर कर्जदाराचे दरमहा 788 रुपये वाचतील. जर ग्राहकांनी बचत केलेल्या रक्कमेत अजून काही रक्कम टाकून दरवर्षी एक अतिरिक्त ईएमआय जमा केला तर त्यांचे कर्ज लवकर संपेल. त्यांचे 20 वर्षांचे कर्ज हे 15 वर्षांतच संपेल.

रेपो दरात चार वेळा कपात

यंदा आरबीआयने आतापर्यंत रेपो दरात एकूण 1.25 टक्क्यांची कपात केली. फेब्रुवारी ते जून महिन्यापर्यंत एकूण एक टक्का रेपो दर घटवला होता. पण ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात कोणताही बदल झाला नाही. रेपो दर जैसे थे ठेवण्यात आला. रेपो दर यापूर्वी 5.5 टक्क्यांवर होता. नवीन 0.25 टक्क्यांच्या कपातीमुळे रेपो दर हा 5.25 टक्क्यांवर आला आहे. पतधोरण समितीच्या पुढील बैठकीत अजून त्यात कपात होण्याची शक्यता आहे.

प्रत्येक दोन महिन्याला बैठक

पतधोरण समितीत एकूण 6 सदस्य असतात. त्यात 3 आरबीआयचे अधिकारी असतात. तर इतर सदस्य हे केंद्राने नियुक्त केलेले असतात. केंद्रीय रिझर्व्ह बँकेची दर दोन महिन्यांनी बैठक होते. केंद्रीय बँक आर्थिक वर्ष 2025-26 साठी पतधोरण समितीच्या बैठकींचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. या आर्थिक वर्षात एकूण 6 बैठका होतील. या समितीची पहिली बैठक 7-9 एप्रिल दरम्यान झाली होती. त्यानंतर जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि 3-5 डिसेंबर दरम्यान 5 वी बैठक झाली होती. आता सहावी बैठक ही 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.