सोनं-चांदी क्रॅश… जगातील सर्वात मोठ्या एक्सपर्टने दिली महत्त्वाची टीप, हजारो लोकांनी केली पोस्ट व्हायरल

गेल्या 11 महिन्यांपासून सोनं, चांदी आणि बिटकॉइनचे भाव कोसळत आहेत. यावर प्रसिद्ध गुंतवणूकदार रॉबर्ट कियोसाकी यांनी महत्त्वाची टीप दिली आहे. कियोसाकी म्हणतात, "कमकुवत मनाचे लोक क्रॅश झाल्यावर विकतात, तर कणखर मनाचे लोक खरेदी करतात." ते स्वतः बिटकॉइन मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी भाव अजून कोसळण्याची वाट पाहत आहेत.

सोनं-चांदी क्रॅश... जगातील सर्वात मोठ्या एक्सपर्टने दिली महत्त्वाची टीप, हजारो लोकांनी केली पोस्ट व्हायरल
gold crash
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 20, 2026 | 5:05 PM

गेल्या 11 महिन्यांपासून सोनं आणि चांदीचे भाव सातत्याने कोसळत आहेत. सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याने असंख्य ग्राहक सोनं खरेदी करताना दिसत आहेत. तर काही लोक सोनं विकताना दिसत आहेत. सोन्याचे भाव अजून कोसळणार असल्याचं सांगितलं जात असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असून आहे त्या भावात सोनं विकलं जात आहे. सोनं खरोखरच विकलं पाहिजे की विकत घेतलं पाहिजे? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. त्यावर प्रसिद्ध एक्सपर्ट रॉबर्ट कियोसाकी यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी एक्सवर एक ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीचे भाव क्रॅश होत आहेत. त्यावर ‘रिच डॅड पुअर डॅड’चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी एक्सवर महत्त्वाची टीप दिली आहे. अशावेळी काही कमकुवत मनाचे लोकच सोनं, चांदी आणि बिटक्वॉईन विकत आहेत, असं सूचक विधान कियोसाकी यांनी केलं आहे.

Loading...

क्रॅश चांगलं की वाईट?

सोने चांदीचे भाव अचानक कोसळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोनं आणि चांदी स्वस्त झाली आहे. तर क्रिप्टोकरन्सी बिटक्वाईनच्या किमतीही घसरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रॉबर्ट कियोसाकी यांची पोस्ट आली आहे. या पोस्टमध्ये कियोसाकी यांनी स्वत:लाही सवाल केला आहे. क्रॅश चांगलं की वाईट? असा सवाल कियोसाकी यांनी केला आहे.

 

सोने, चांदी आणि बिटक्वॉइन सर्वच क्रॅश होत आहे. पण काही कमकुवत मनाचे लोक ते विकत आहेत. तर मजबूत मनाचे लोक सोनं चांदी, बिटक्वाइन कोसळत असल्याने ते खरेदी करण्याची वाट पाहत आहेत. मी बिटक्वॉईन कधी क्रॅश होतंय याची वाट पाहत आहे. मला मोठ्या प्रमाणात बिटक्वॉइनची खरेदी करायची आहे, असं कियोसाकी यांनी म्हटलं आहे.

कारण सांगितलं…

रॉबर्ट कियोसाकी यांनी या मागचं कारण सांगितलं आहे. सोने चांदी आणि बिटक्वॉइनचे दर घसरत आहेत. याची अनेक कारणे आहेत. यूस फेड, बँक आणि बाँड बाजारांची अक्षमता हे त्यामागचं मुख्य कारण आहे. अमेरिकेचं कर्ज अजून वाढत जाणार आहे. कारण बँक चालवणारे लोक त्यांच्या सिस्टिमच्या माध्यमातून कायदेशीररित्या आपली संपत्ती हडप करण्यात व्यस्त आहेत, असं कियोसाकी यांनी म्हटलं आहे.

या डिझाननुसार बिटक्वॉईन एकूण 21 मिलियनपर्यंत जाईल. सुमारे 20 मिलियन यापूर्वीच माइन करण्यात आले आहेत. माझ्या माहितीनुसार, बिटक्वॉइन सारखा पैसा पूर्वीही राहिला नाही. जेव्हा 21 वा मिलियन बिटक्वॉइन होईल तेव्हा काय होईल, याचा मी विचार करत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

मी खरेदी करण्यासाठी उत्सुक

या व्हायरल पोस्टमध्ये रॉबर्ट कियोसाकी यांनी आणखी एक गोष्ट नमूद केली आहे. बिटक्वॉइनच्या किमती कोसळत आहेत. मी तर अजून अधिक क्वॉइन खरेदी करण्यासाठी उत्सुक आहे. कारण एकूण 21 मिलियन बिटक्वॉइनही माइन करण्यात येऊ शकतात. याचा परिणाम होणार नाही, असं होऊ शकतं. माझ्याकडून खर्च करण्यात आलेली ही आजवरची सर्वात मोठी गोष्ट ठरू शकते. तुम्ही काय विचार करता? काळजी घ्या, असं त्यांनी म्हटलंय.

रॉबर्ट कियोसाकी यांच्या प्रत्येक पोस्ट प्रमाणे Gold-Silver Crash क्रॅशवरील त्यांची ही नवी पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टला हजारो लाइक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. एक्सवर कियोसाकीची मोठी फॅन फॉलोइंग आहे. त्यांचे 2.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us