मी आधीच संकट पाहिलं होतं… जगाला श्रीमंतीचा कानमंत्र देणाऱ्या व्यक्तीची भविष्यवाणी ठरली खरी; पोस्ट चर्चेत
रॉबर्ट कियोसाकी यांची 'मी आधीच संकट पाहिलं होतं' ही पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यांनी 2008 च्या लेहमन ब्रदर्स संकटासह अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याचा दावा केला. विशेषतः बेबी बूमर्सना आर्थिक शिक्षण न मिळाल्याने भविष्यात मोठे आर्थिक संकट येणार असून ते बेघर होऊ शकतात, असा इशारा दिला आहे.

रिच डॅड पुअर डॅड या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी त्यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याचं या पोस्टमधून दावा केला आहे. सोशल मीडिया पोस्टमधून सोनं, चांदी आणि बिटक्वॉइन खरेदी करण्याचा मी नेहमी सल्ला देत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या व्हायरल पोस्टमध्ये त्यांनी बेबी बूमर्सचा उल्लेख करत त्यांच्यासोबत फसवणूक झाली का? असा सवालही केला आहे. त्यामुळे सध्या कियोसाकी यांची पोस्ट अधिकच चर्चेत आहे.
रॉबर्ट कियोसाकी यांनी पोस्टमध्ये एक महत्त्वाचा सवाल केला आहे. बेबी बूमर्स (1946-1964 दरम्यान जन्मलेले लोक) सोबत फसवणूक झाली का? असा सवाल त्यांनी केला आहे. त्याचं उत्तरही त्यांनीच दिलं आहे. 1974मध्ये बूमर्स अशी पिढी होती, जिला कोणत्याही फायनान्शिअल एज्युकेशनशिवाय ERISA म्हणजे एम्प्लॉयमेंट इन्कम सेक्युरिटी अॅक्ट मिळाला. याला ‘401k’ सुद्धा म्हटलं जातं, असं कियोसाकी यांनी म्हटलंय.
एखादं सरकार जेव्हा एखादा कायदा मंजूर करतं, तेव्हा त्यांच्या शब्दांचा अर्थ खरं तर उलटा असतो, असं सांगतानाच कियोसाकी यांनी उदाहरण म्हणून सोशल सेक्युरिटीचा उल्लेख केला. 1964मध्ये फानान्शिअल प्लानर्स नावाच्या एका नव्या प्रोफेशनचे लोक बूमर्सला 60/40 चा फॉर्म्युला (60% स्टॉक आणि 40% बॉन्ड) घेण्यासाठी समजावत होते. विशेष म्हणजे असं सांगणाऱ्यांनी कोणतंही फायनान्शिअल एज्युकेशन घेतलेलं नव्हतं.
DID THE BABY BOOMERS get F’d?
A: in 1974 the Boomer’s were the first generation to receive ERISA aka the “401k,” without any financial education.
ERISA=Employee Retirement Income Security ACT
BTW: Anytime the government passes an act…the words mean the opposite.
For Example “Social Security?”
In 1964, Boomers were being taught by a new profession called “Financial Planners” also without any financial education to pitch the 60/40… 60% stocks 40% bonds.
It took only 7 weeks to get a financial planner’s license back then.
I could not believe it. I could see this crisis we are in today…coming….the crisis of Boomers getting F’d.
Today, in 2026….Central Banks throughout the world are dumping US Bonds to buy gold….by the tons.
When bonds go down… the stock market, like the S&P 500 will crash, which will leave millions of boomers out of time and out of money to recover.
Millions of Boomers may be homeless or moving in with kids and grandkids.
Hope I am wrong, but I do not think I am. My predictions, starting with the crash of Lehmann Brothers on CNN, on Wolf Blitzer’s Situation Room show in 2008, has been on time and target.
That is why I have ended my X’s with “Buy gold, silver, and Bitcoin”
for years.Nothing has changed, except I do own rental apartments and oil wells in US.
I am not a financial planner nor do I make money from my recommendations.
That is why my x-wife Kim and I created the Cashflow Boardgame, in 1996, and I wrote Rich Dad Poor Dad in 1997 and many other books.
Our mission has been to create products so people could teach people….what our schools and Wall Street will not teach you.
Rough times ahead for the unprepared and great times for those that are.
Please read, learn, join a Cashflow Club, teach yourself, and others.
“The more you learn and the more you teach….the richer you become.”
Please take care.
— Robert Kiyosaki (@theRealKiyosaki) September 28, 2026
आधीच संकट पाहिलं
त्यावेळी फायनान्शिअल प्लानरचे लायसन्स मिळवण्यासाठी केवळ सात आठवडे लागायचे. मला विश्वासच बसत नाहीये. मी जे संकट पाहत आहे… ते मी यापूर्वीच पाहिलं होतं. बूमर्ससोबत फसवणूक होणार असल्याचं हे संकट होतं, असं कियोसाकी यांनी म्हटलं आहे.
आज 2026मध्ये जगभरातील सेंट्रल बँक सोने खरेदी करण्यासाठी यूएस बॉन्ड विकत आहे. ते सुद्धा टनाच्या हिशोबाने. जेव्हा बॉन्डची किमत पडते तेव्हा स्टॉक मार्केट क्रॅश होते. त्यामुळे लाखो बूमर्सकडे रिकव्हर करण्यासाठी ना वेळ असेल ना पैसा. लाखो बूमर्स बेघर होऊ शकतात. किंवा त्यांना आपल्या नातवंडांकडे आश्रय घ्यावा लागू शकतो, असं कियोसाकी यांनी म्हटलं आहे.
सोने चांदी खरेदी करण्याचा सल्ला का?
कदाचित मी चुकीचा असेल, मला वाटत नाही असं असेल. माझ्या भविष्यवाण्यांची सुरुवात 2008मध्ये झाली. सीएननवर वुल्फ ब्लिट्जरच्या सिच्युएशन रुम शोमधील लेहमन ब्रदर्सच्या क्रॅशच्या भविष्यवाणीने ही सुरुवात झाली. माझ्या भविष्यवाण्या नेहमीच योग्यवेळी आल्या आणि त्या तंतोतंत खऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे मी अनेक वर्षांपासून एक्सवर सोने, चांदी आणि बिटक्वॉइन खरेदी करण्याची सल्ला देत आलो आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दुसऱ्यांना शिकवण्याचा उद्देश
सोनं, चांदी, बिटक्वॉईन खरेदी करण्याच्या सल्ल्यामागचं कारणंही त्यांनी सांगितलं. यूएसमधील भाड्याने देण्यात येणारे अपार्टमेंट आणि तेलाच्या विहिरी वगळता अजूनही काहीच बदलेलं नाही. मी काही फायनान्शिअल प्लानर नाहीये. मी सल्ला देण्याचे पैसेही घेत नाही. त्यामुळे मी आणि माझी आधीची बायको किम यांनी 1996मध्ये कॅशफ्लो बोर्ड गेम बनवला आणि 1997मध्ये मी रिच डॅड पूअर डॅडसह अनेक पुस्तके लिहिली, असंगही ते म्हणाले.
जेवढं शिकाल, श्रीमंत व्हाल
माझा हेतू प्रोडक्ट्स बनवणं हा होता. कारण लोक दुसऱ्यांना शिकवू शकतील. आपल्याा शाळा आणि वॉल स्ट्रिट या गोष्टी तुम्हाला शिकवणार नाहीत. जे लोक तयार नाहीत, त्यांच्यासाठी पुढे कठिण काळ आहे. आणि जे लोक तयार आहेत, त्यांच्यासाठी चांगला काळ आहे. तुम्ही जेवढे अधिक शिकता, तेवढेच तुम्ही श्रीमंत बनता, असंही त्यांनी म्हटलंय.