रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार

Rohit Sharma eCricket: क्रिकेटर रोहित शर्मा आता तुमच्या क्रिकेटमध्ये खेळेल असे सांगितले तर तुम्हाला नवल वाटू देऊ नका. कारण यावर्षीपासून 'ई-क्रिकेट' गेम येणार आहेत. ते एक अधिकृत खेळाडू म्हणून खेळतील. या गेमचे बीटा व्हर्जन सप्टेंबर महिन्यात येईल.

रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार
रोहित शर्मा, क्रिकेटर
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Aug 24, 2026 | 2:34 PM

क्रिकेटच्या मैदानात आपल्या बॅटिंगने दरारा निर्माण करणारा रोहित शर्मा आता गेमिंगच्या जगातही चमकणार आहे. टीम इंडियाच्या माजी कर्णधाराने गेमिंग स्टुडिओ लाईटफ्यूरी गेम्समध्ये एक गुंतवणूकदार म्हणून एंट्री घेतली आहे. केवळ इतकेच नाही तर त्याच्या चाहत्यांच्या टीममध्ये सुद्धा तो खेळेल. या कंपनीच्या नवीन गेम ‘ई-क्रिकेट’ (eCricket) मध्ये तो एक अधिकृत परवानाधारक खेळाडू म्हणून दिसेल. याचा अर्थ लवकरच तुमच्या मोबाईलमधील गेममध्ये हिटमॅनसह व्हर्चुअल मैदानावर तो जोरदार शॉट्स लगावेल.

क्रिकेटचे मैदान ते गेमिंगचे जग

गेमिंगविषयी जेन झीमध्ये मोठी क्रेझ आहे. लाईटफ्यूरी गेम्स आपल्या नवीन प्रोजेक्ट ई-किकेटविषयी आनंदी दिसला. कंपनी सप्टेंबर 2026 मध्ये या गेमचे बीटा व्हर्जन सुरू करत आहे. या गेमविषयी गेमिंग कम्युनिटीत आतापासूनच जोरदार उत्साह आहे. आतापर्यंत 3 लाखांपेक्षा अधिक चाहत्यांनी त्यासाठी साईन-अप केले आहे. गेल्यावेळी हा गेम बाजारात आला. त्याचे अधिकृत टीझर 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले. गेम डेव्हलपर्सच्या मते, क्रिकेट जगतात रोहित शर्माचा दीर्घ अनुभव आहे. त्याचा व्हर्च्युअल खेळ चाहत्यांना एक नवीन थ्रील देईल.

धोनी आणि पंड्या अगोदरच मैदानात

रोहित शर्मा या गेमिंग कंपनीत पैसे गुंतवणारे एकमेव स्टार खेळाडू नाहीत. ते या कंपनीत गुंतवणूक करणारे आठवे मोठे क्रिकेटर आहेत. यापूर्वी एमएस धोनी, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, तिलक वर्मा आणि साई सुदर्शन यांनी सुद्धा गुंतवणूक केली आहे. कंपनीने 2026 मध्ये क्रिकेट गेमिंग फ्रेचाईजीच्या विकासासाठी 1.1 कोटी डॉलरचा (11 दशलक्ष रुपये) निधी जमवला आहे.

गेमरला स्वतः तयार करता येणार टीम

या गेममध्ये अल्टिमेट स्क्वॉड मोड हा खास भाग आहे. या मोडमध्ये जगभरातील 700 पेक्षा अधिक खेळाडू असतील. गेमर वेगवेगळ्या खेळाडूंना एकत्र घेत स्वतःची टीम तयार करू शकेल. विशेष म्हणजे सामना सुरू झाल्यावर त्याचे धावते समालोचन, कॉमेंट्री माजी भारतीय क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धु करेल. त्यामुळे हे एक खास सरप्राईज असेल. त्यामुळे सामना हा एका वेगळ्या उंचीवर पोहचेल. चाहत्यांच्या स्क्रीनवर चिअर्स गर्ल्सच्या प्रोत्साहनासह मैदानासारखा फील येईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us