US Federal reserves च्या व्याज दरवाढीचा भारताला फायदा; रुपयाच्या मुल्यात सुधारणा

| Updated on: Mar 19, 2022 | 12:03 PM

अमेरिकेने व्याज दर वाढवल्यानंतर त्याचा परिणाम हा अमेरिकन चलनावर झाला आहे. डॉलरच्या मुल्यामध्ये घसरण झाली आहे. तर दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम दिसत आहे.

US Federal reserves च्या व्याज दरवाढीचा भारताला फायदा; रुपयाच्या मुल्यात सुधारणा
Follow us on

नवी दिल्ली : अमेरिकन फेडरल रिझर्व्हने (US Federal reserves) व्याजदरात वाढ (Interest rate hikes) करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार व्याज दरात 0.25 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. वाढती महागाई नियंत्रित करण्यासाठी अमेरिकेने व्याजदर वाढवल्याचे बोलले जात आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये अमेरिकन फेडरल रिझर्व्ह सातवेळा व्याज दरात वाढ करू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान अमेरिकेने व्याज दर वाढवल्यानंतर त्याचा परिणाम हा अमेरिकन चलनावर झाला आहे. डॉलरच्या मुल्यामध्ये घसरण झाली आहे. तर दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम दिसत असून, रुपयाच्या मुल्यामध्ये 37 पैशांनी सुधारणा झाली आहे. शनिवारी (Dollar vs Rupees) रुपयाचे मुल्य 75.84 रुपये प्रति डॉलर इतके झाले आहे. दुसरीकडे अशियाई शेअरबाजारात देखील तेजीचे वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?

अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेमध्ये महागाई वाढत आहे. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी अमेरिकेने व्याज दरात वाढ करण्याचे पाऊल उचलले आहे. याचा सकारात्मक परिणाम हा भारतीय अर्थव्यवस्थेवर होताना दिसून येत आहे. भारतीय चनल असलेल्या रुपयाच्या मुल्यात वाढ झाली आहे. रुपयाच्या मुल्यात डॉलरच्या तुलनेत 37 पैशांनी वाढ झाली आहे. दरम्यान याबाबत बोलतान HDFC सिक्योरिटीजचे दिलीप परमार यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये असलेली स्थिरता आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ करण्याचा घेतलेला निर्णय यामुळे रुपयामध्ये सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे.

कच्चा तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या

दरम्यान दुसरीकडे पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये तेजी दिसून येत आहे. आज कच्च्या तेलाचे दर 1.21 टक्क्यांनी वाढले आहेत. कच्च्या तेलाची किंमत अंतरराष्ट्रीय बाजारात 108 डॉलर प्रति बॅरलवर पोहचली आहे. दोन आठवड्यापूर्वी कच्च्या तेलाच्या किमती 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या 100 डॉलरच्याही खाली आल्या होत्या. आज पुन्हा एकदा कच्च्या तेलाचे भाव वाढले असून, ते 108 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत.

संबंधित बातम्या

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ; इंधनाचे नवे दर जारी

5.5 लाखांची Hyundai कार 2.5 लाखात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

crude oil Imports : कच्च्या तेलाच्या आयातीमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ, भविष्यात इंधनाचे दर स्थिर राहणार?