Russia, Ukraine war : जगातील 186 देशात महागाईचा भडका उडणार; युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा गंभीर इशारा

| Updated on: Apr 15, 2022 | 7:32 AM

रशिया, युक्रेन युद्धाच्या (Ukraine War) पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) गंभीर इशारा देण्यात आला आहे. रशिया युक्रेन युद्धाचा जगातील जवळपास सर्वच देशांना फटका बसणार असल्याचे नाणेनिधीने म्हटले आहे.

Russia, Ukraine war : जगातील 186 देशात महागाईचा भडका उडणार; युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा गंभीर इशारा
Follow us on

रशिया, युक्रेन युद्धाच्या (Ukraine War) पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) गंभीर इशारा देण्यात आला आहे. रशिया युक्रेन युद्धाचा जगातील जवळपास सर्वच देशांना फटका बसणार असल्याचे नाणेनिधीने म्हटले आहे. तसेच युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्थरावर महागाई वाढली असून, त्याची झळ जागतिक अर्थव्यवस्थेला (Global Economy) बसत असल्याचे आयएमएफचे व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, या युद्धामुळे जगातील तब्बल 186 देशांच्या जीडीपीवर परिणाम होऊ शकतो. युद्धामुळे अन्नधान्य आणि ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. युद्धामुळे आधीच मोठ्याप्रमाणात आयात, निर्यात प्रभावित झाली आहे. युध्द आणखी काही दिवस सुरू राहिल्यास आफ्रिका आणि पश्चिम आशियामधील काही देशांमध्ये अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन, महागाई उच्च स्थरावर पोहोचू शकते. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची पुढच्या आठवड्यात बैठक होणार आहे, त्यापूर्वीच चिंतेत भर घालणारे वक्तव्य क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांनी केले आहे.

अर्थव्यवस्थेवर कोरोनाचे संकट कायम

पुढे बोलताना जॉर्जिएवा यांनी म्हटले आहे की, गेले दोन वर्ष जगावर कोरोनाचे संकट होते. कोरोना महामारीच्या काळात जगाचे मोठे नुकसान झाले. कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. या संकटातून जग सावरत असतानाच आता रशिया युक्रेन युद्धाचे नवे संकट जगासमोर आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ग्राहकांकडून अचानक वस्तूंची मागणी वाढली. मात्र वाढती मागणी पूर्ण करण्यास कंपन्या असमर्थ ठरल्याने महागाई वाढली. आता या महागाईमध्ये आणखी रशिया, युक्रेन युद्धाची भर पडली आहे. हे युद्ध आणखी काही दिवस सुरू राहिल्यास जगात महागाईची समस्या आणखी तीव्र बनू शकते.

अमेरिकेकडून रशियावर आर्थिक निर्बंध

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या एक महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनचं मोठं नुकसान झालं आहे. रशियाने युद्ध बंदीची घोषणा करावी यासाठी अमेरिका आणि नाटोचे सदस्य असलेल्या युरोपीयन राष्ट्रांकडून रशियावर दबाव निर्माण केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून अमेरिकेसह युरोपीयन राष्ट्रांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. या आर्थिक निर्बंधांचा रशियाला मोठा फटका बसल्याचे पहायला मिळत आहे. रशियासोबतच इतर देशात देखील महागाई वाढली आहे.

संबंधित बातम्या

today Petrol diesel rate : सलग दहाव्या दिवशी इंधनाचे दर स्थिर, मात्र एक्साइज ड्यूटी कमी होणार नसल्याचे संकेत

Petrol, diesel price: इंधनाचे भाव कसे कमी होणार?, पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितला उपाय

‘कोटक महिंद्रा बँके’ची ग्राहकांसाठी भेट, आता FD वर पूर्वीपेक्षा मिळेल जास्त नफा !