ICICI आणि SBI कडून कार्डलेस सुविधा सुरु, पैसे कसे काढणार?

| Updated on: Jan 26, 2020 | 11:32 PM

भारतीय स्टेट बँक (SBI) बऱ्याच दिवसांपासून ग्राहकांना एटीएम कार्डशिवाय पैस काढण्याची सुविधा (icici and sbi give card less service) देत आहे.

ICICI आणि SBI कडून कार्डलेस सुविधा सुरु, पैसे कसे काढणार?
या गाईडलाईन्स पैसे घेणे आणि देण्यासंबंधी तयार करण्यात आल्या आहेत. ज्याने कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मदत होईल.
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँक (SBI) बऱ्याच दिवसांपासून ग्राहकांना एटीएम कार्डशिवाय पैस काढण्याची सुविधा (icici and sbi give card less service) देत आहे. यासाठी बँकेकडून सध्यातरी काही निवडक एटीएममशीनमधूनच पैसे काढण्याची व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. एसबीआय पाठोपाठ आता आयसीआयसीआय बँकेनेही (ICICI) आपल्या ग्राहकांसाठी एटीएम कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा (icici and sbi give card less service) सुरु केली आहे.

1. एसबीय एटीएम कार्डशिवाय पैसे कसे काढायचे?

एसबीआयच्या ग्राहकांना पैसे काढण्यासाठी प्रथम योनो अॅपमध्ये इंटरनेट बँकिगद्वारे लॉगईन करावे लागेल. त्यानंतर अकाऊंट होल्डर भविष्यात पुन्हा केव्हाही योनो अॅपमधून सहज लॉगईन करण्यासाठी 6 अंकाचे MPIN सेट करु शकतात.

एसबीआयच्या कार्डलेस सुविधेचा वापर कसा कराल?

योनो अॅपमध्ये लॉगईन केल्यानंतर एसबीआय अकाऊंट होल्डरला योनो कॅशवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर एटीएम सेक्शनमध्ये जावे लागेल. तेथे किती रुपये काढायचे आहे ती किंमत टाकावी लागेल. आता एसबीआय तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर तुम्हाला योनो कॅश ट्रॅन्जेक्शन नंबर पाठवेल. अकाऊंट होल्डरला एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढण्यासाठी योनो कॅश ट्रॅन्जेक्शन नंबरची गरज लागेल. हा पिन चार तासासाठी वैध असतो.

एटीएमच्या होम पेजवर युजरला कार्डलेस ट्रॅन्जेक्शनचा पर्याय निवडावा लागेल. ज्यानंतर योनो कॅश आणि बाकी माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुम्ही पैसे काढू शकता.

पैसे काढण्याची मर्यादा

सिंगल ट्रॅन्जेक्शनमध्ये एसबीआय ग्राहक कमीत कमी 500 आणि जास्तीत जास्त 10 हजार रुपये काढू शकतो.

2. आयसीआयसीआय एटीएम कार्डशिवाय पैसे कसे काढायचे?

आयसीआयसीआय बँकेनेही एटीएम कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा सुरु केली आहे. बँकेचा मोबाईल अॅप ‘iMobile’ च्या माध्यमातून 15 हजार एटीएममधून ग्राहक पैसे कार्डशिवाय काढू शकतात.

आयसीआयसीआय कार्डलेस सुविधेचा वापर कसा कराल?

‘iMobile’ अॅपमध्ये लॉगईन करा आणि ‘Services’ and ‘Cash Withdrawal at ICICI Bank ATM’ ची निवड करा. त्यानंतर किंमत टाका, तसेच अकाऊंट नंबरची निवड करा आणि 4 अकांचा टेंपररी PIN तयार करुन सबमीट करा. तेव्हा तुम्हाला तातडीने एक रेफरेन्स ओटीपी नंबर मिळेल.

आयसीआयसीआय बँकच्या कोणत्याही एटटीएमवर जा आणि कार्डलेस कॅश विड्रॉल ऑप्शन निवडा. त्यानंतर मोबाईल नंबर टाका आणि रेफरेन्स ओटीपी नंबरवर जावा. आता टेंपररी PIN टाका आणि जेवढे रुपये काढायचे ती किंमत टाकून पैसे काढा.

पैसे काढण्याची मर्यादा

या सुविधेच्या माध्यमातून 20 हजार रुपयापर्यंत पैसे काढू शकता.